शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-भिवंडी मार्गिकेवर डिसेंबरपर्यंत मेट्रोची धाव?; मेट्रो ५ कारशेडविना मेट्रो चालवण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 08:34 IST

डिसेंबरपर्यंत कारशेडचे काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने सुरुवातीला गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी स्टॅबलिंग मार्गिका उभारण्यात येणार आहेत

अमर शैलामुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हालचाली सुरू केल्या आहेत.  त्यामुळे भिवंडीला पहिली मेट्रो या वर्षाअखेर मिळण्याची शक्यता आहे, असे ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो ५ मार्गिका २४.४५ किमी लांबीची असून, त्यावर १७ स्थानके आहेत. यासाठी सुमारे ८ हजार ४१६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ती दोन टप्प्यांत सुरू करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका असा १२.२० किमी लांबीचा मार्ग सुरू करण्यात येत आहे. यामध्ये सात स्थानकांचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे  ९७ टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. केवळ कापूरबावडी येथील एका खांबाचे काम रखडले होते. एका नेत्याच्या विरोधामुळे जाहिरात बोर्ड हटवू न शकल्याने हे काम थांबले होते. तसेच मेट्रो मार्गिकेसाठी एक इमारत अडथळा ठरत होती. आता हा बोर्ड काढून टाकण्यात आला असून, अडथळे दूर झाले आहेत.

मेट्रो ५ वर दृष्टीक्षेप पहिल्या टप्प्यातील मार्ग कापूरबावडी ते धामणकर नाकालांबी -  १२.२० किमीस्थानके - ७

सप्टेंबरपर्यंत चाचण्याउर्वरित स्थापत्य कामेही लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर या मेट्रो मार्गिकेवर यंत्रणा उभारण्याच्या कामांना गती दिली जाणार असून, सप्टेंबरपर्यंत चाचण्यांना सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. डिसेंबरपर्यंत कारशेडचे काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने सुरुवातीला गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी स्टॅबलिंग मार्गिका उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे मेट्रो चालवण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे.

खरेदीसाठी कंत्राट मेट्रोची कारशेड कशेळी येथे उभारण्यात येणार आहे. ही जागा दलदलीची आहे. त्यामुळे त्यावर बांधकाम करण्यापूर्वी भराव टाकून ती बांधकामायोग्य करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर कारशेडच्या कामाला सुरुवात होईल. ती तयार होण्यासाठी दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेट्रो ५ मार्गिकेसाठी २२ मेट्रो गाड्या खरेदीकरिता टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीला ऑक्टोबरमध्ये २४८१ कोटींचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदाराला रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग व टेलिकॉम यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, डेपो प्लांट मशिनरी आदी पुरवण्याचे काम करावे लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane-Bhiwandi Metro Likely by December; Operations Without Car Shed?

Web Summary : Thane-Bhiwandi-Kalyan Metro 5 aims to launch by December. Initial operations may occur without a completed car shed, using stabling lines for maintenance. The first phase, Kapurbawdi to Dhamankar Naka, is 97% complete, with trials expected by September.
टॅग्स :Metroमेट्रो