शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:59 IST

डीएमआरसीकडून चाचपणी : काही दिवसांत सुरू होणार सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाचच्या मंजूर मार्गात बदल करण्याच्या हालचाली एमएमआरडीएकडून सुरू असताना आता हा मार्ग उल्हासनगरपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सुरू केले आहेत. या कामासाठी भौगोलिक सर्वेक्षण येत्या काही दिवसांत सुरू होईल.ठाणे-कल्याण-भिवंडी या २४.९ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. ते आॅक्टोबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामासाठी ८,४१६ कोटी रुपये खर्च केले जातील. २०१३ सालापर्यंत या मार्गावरून दररोज सुमारे तीन लाख प्रवासी प्रवास करतील. प्रकल्पाचा वित्तीय अंतर्गत परतावा दर मालमत्ता विकासासह (एफआयआयआर) ६.०२ टक्के इतका असेल. तर, आर्थिक अंतर्गत परतावा (ईआयआरआर) १७.०९ टक्के असेल, असे सांगितले जात आहे.या मार्गिकेच्या ठाणे-भिवंडी मार्गावरील कामास सुरुवात झाली आहे. मात्र, भिवंडी-कल्याण परिसरातील मार्ग बदलण्यासाठी अनेक निवेदने एमएमआरडीएकडे देण्यात आली आहेत. तसेच, या बदलांसाठी स्थानिक नेतेही आग्रही आहेत. त्यामुळे भिवंडी-कल्याण या टप्प्यातील मार्गिका अंतिम झाल्यानंतर त्या स्थापत्य कामाच्या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.एमएमआरडीएकडून मार्ग बदलांच्या हालचाली सुरू असताना या मार्गाच्या विस्ताराचे नियोजन डीएमआरसीकडून केले जात आहे. राजीव गांधी चौक ते टेमघर आणि दुर्गाडी चौक ते उल्हासनगर असा १५ किमी विस्तार करण्याचे नियोजन आहे. या सेवेमुळे नागरिकांना निश्चितच फायदा होईल असे सांगितले.

... त्यानंतरच ठरणार पुढील दिशामेट्रो पाचचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये केली होती. डीएमआरसीने सर्वेक्षणाच्या कामासाठी निविदा काढून त्याला मूर्त रूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भौगोलिक सर्वेक्षणात या मार्गिकेची सुसाध्यता स्पष्ट झाल्यानंतर त्याची व्यवहार्यता तपासणी होईल आणि त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो