शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मर्सिडीज बेंझ कार उलटली; सुदैवाने पाचही प्रवासी सुखरूप बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 10:31 IST

अपघातग्रस्त कारमधील सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

ठाणे: ठाण्यातून जाणाऱ्या पूर्व द्रुत गती मार्गावरील तीन हात नाका उड्डाणपूल उतरताना ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरती मर्सिडीज बेंझ कार चालकाचा  ताबा सुटला. त्यामुळे  ही कार उलटल्याची घटना सोमवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडली. सुदैवाने या कारमधील पाच ही जणांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अपघातग्रस्त कारमधील सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

कार मालक व चालक मोहम्मद आक्रम निर्माण यांच्यासह आणखी चार जण हे सोमवारी पहाटे भिवंडी, आलहिंद धाबा ते मुंबईकडे ठाणे मार्गे निघाले होते. त्यांची कार पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर  तीन हात नाका पूल उतरताना  निर्माण यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार उलटली. यावेळी कारमधील तेल रस्त्यावर पसरले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच नौपाडा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली.

सुदैवाने कारमधून प्रवास करणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समोर आले. घटनास्थळी एका हायड्रा मशीनच्या  सहाय्याने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता आपत्ती व्यवस्थापन विभागाने वाहतुकीसाठी मोकळा केला. यावेळी कारमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा असे पाच प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती  आपत्ती व्यवस्थापन विभागाने  दिली.

टॅग्स :Accidentअपघातcarकारthaneठाणे