शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

बदलापूर प्रकरण: शाळा, पोलिसांकडून पीडितेच्या पालकांचा ‘मानसिक छळ’ अन् जबाबदारी झटकण्यासाठी नको नको ते आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 05:47 IST

शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत चौकशी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : शाळेत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करू नये, याकरिता शाळा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाचा मानसिक छळ केल्याचा ठपका शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या दोन सदस्य समितीने ठेवला असल्याचे समजते.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी अत्याचाराची माहिती सर्वप्रथम शाळा प्रशासनाला दिली होती. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकेने हा प्रकार शाळेत घडलाच नाही, कुठेतरी बाहेर घडला आहे, असा दावा केला. मुलीच्या गुप्तांगाला झालेली जखम सायकल चालवल्यामुळेही होऊ शकते, असे म्हणत मुख्याध्यापिकेने ही घटना दडपली कशी जाईल हे पाहिले, या मागील कारणाचा शोध चौकशीअंती लागेल, असे सांगण्यात येते.  

शाळा व्यवस्थापन दखल घेत नसल्याने अत्याचारग्र्सत मुलीच्या कुटुंबीयांनी बदलापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तातडीने भेट घेतली. शितोळे यांनीही मुख्याध्यापिकेचीच री ओढली आणि तीच थिएरी पालकांना ऐकवली. सायकल चालवल्यामुळे किंवा घरात, घराजवळही असा गैरप्रकार होऊ शकतो, असे म्हणत शितोळे यांनी शाळा व्यवस्थापनाचीच पाठराखण केली. शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत चौकशी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. 

प्रकरण दडपण्याचा शाळा, पोलिसांचा प्रयत्न  - शाळेच्या मुख्याध्यापिकेने जबाबदारी झटकण्याकरिता पीडित मुलीच्या पालकांवरच नको नको ते आरोप केले.- शाळा व्यवस्थापनाने खासगी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल अमान्य केला आणि सायकल चालवल्यामुळे जखम झाली असेल, असा दावा केला. - पोलिसांनीही सायकलमुळे जखम होऊ शकते, असे म्हणत दुर्लक्ष केले. मात्र, मनसे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या आग्रही मागणीमुळे पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर