नेपाळमध्येही साजरा झाला मासिक पाळीचा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:19+5:302021-05-25T04:45:19+5:30
ठाणे : होप इज लाइफ, नेपाळतर्फे मासिक पाळी या विषयावर दोन उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मासिक पाळीवर आधारित ...

नेपाळमध्येही साजरा झाला मासिक पाळीचा महोत्सव
ठाणे : होप इज लाइफ, नेपाळतर्फे मासिक पाळी या विषयावर दोन उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मासिक पाळीवर आधारित कलानिर्मिती करण्यास उत्साही २८ जणांसह रविवारी या उपक्रमाची सुरुवात झाली. झाम्बिया, रवांडा, केनियाप्रमाणे नेपाळमध्येही दोन दिवस डिजिटल माध्यमातून मासिक पाळीचा महोत्सव साजरा झाला.
२३ मे रोजी सगळ्या सहभागी संस्थांशी ओळख करून देण्यात आली. त्याचबरोबर म्युज फाउंडेशनसह दरवर्षी मासिका महोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो हे सांगितले. शाश्वत मासिक पाळी या संकल्पनेची सहभागी सगळ्यांना तोंडओळख करून दिली. पुनर्वापर करता येणारे कापडी पॅड्स तसेच पाळी दरम्यान वापरता येणाऱ्या काही शाश्वत उत्पादनांबद्दल अधिक माहिती दिली. या सगळ्या कलाकृतींचे, तसेच ते तयार करणाऱ्यांचे छायाचित्र आमच्या सोशल मीडिया पेजेसवर टाकण्यात येईल. मासिक पाळीचक्राविषयी २१ मे रोजीही कार्यशाळा घेण्यात आली. तीत जोशियान होसनर या मासिक पाळी तज्ज्ञांकडून अतिशय रंजक पद्धतीने स्त्रियांच्या मासिक पाळीचक्राविषयी माहिती देण्यात आली. दरम्यान, सोप्या, सुंदर शब्दांत दिलेल्या माहितीमुळे मासिक पाळीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक पडला.