पुरुषप्रधान व्यवस्थेचा त्रास पुरुषांनाही जाणवताे - मुक्ता दाभाेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 23:56 IST2021-03-08T23:55:51+5:302021-03-08T23:56:42+5:30

वुमन अँड चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Men also feel the pain of patriarchal system - Mukta Dabhalkar | पुरुषप्रधान व्यवस्थेचा त्रास पुरुषांनाही जाणवताे - मुक्ता दाभाेलकर

पुरुषप्रधान व्यवस्थेचा त्रास पुरुषांनाही जाणवताे - मुक्ता दाभाेलकर

ठळक मुद्देवुमन अँड चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रीवर्गाला जसा मानसिक शारीरिक त्रास होतो तसाच तो पुरुष वर्गाला होत असतो. त्यामुळे या पुरुषसत्ताक व्यवस्थेला गाडून दोन्ही वर्ग एकत्रित मार्गक्रमण करतील, तेव्हाच खरा महिला दिन साजरा होऊ शकेल, असे  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी साेमवारी भिवंडी येथे मत व्यक्त केले.

वुमन अँड चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दाभाेलकर म्हणाल्या की, स्त्रियांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळेच आपली समाजातील जागा आपण बदलू शकतो. यावेळी भिवंडी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भिवंडी तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गांधी विचारांच्या प्रचारक साधना वैराळे, पंचायत समिती सभापती ललित पाटील, उपसभापती सबिया इरफान भुरे, भ्रष्टाचार निर्मूलन न्यासाचे विश्वस्त अल्लाउद्दीन शेख, तहसीलदार अधिक पाटील, नायब तहसीलदार गोरख फडतरे, महेश चौधरी, वूमन अँड चाइल्ड फाउंडेशनचे प्रभाकर जाधव, अलंकार वारघडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर जाधव तर आभार प्रदर्शन अलंकार वारघडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रसाद काबाडी यांनी केले.

Web Title: Men also feel the pain of patriarchal system - Mukta Dabhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.