शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे आजोबांची भेट, पोलिसांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 04:58 IST

कळवा पोलिसांचा पुढाकार : दुभाषीची घेतली मदत

ठाणे : सोशल मीडियाच्या मदतीने कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजोबाला त्यांच्या नातवाची भेट घडवून दिली. या कामात मदत करणाऱ्या बाबुराम यादव यांचा पोलिसांनी विशेष सत्कारही केला. चुलबूल यादव हे कळव्याच्या सह्याद्री सोसायटीजवळ ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांना आढळले. त्यांना केवळ नाव सांगता येत होते. पण, पूर्ण पत्ता काहीच सांगता येत नव्हता.

कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली. चुलबूल हे दहिसर येथे मुलाकडे वास्तव्याला असून मूळचे ते बिहारचे आहेत. ते भोजपुरी भाषा बोलत होते. हिंदी किंवा मराठी त्यांना येत नव्हते. पत्ता सांगताना ते अडखळत असल्याने त्यांच्या राहण्याचे ठिकाण किंवा मुलांचा पत्ताही त्यांना नीट सांगता येत नव्हता. बागडे यांनी बाबुराम यादव या भोजपुरी बोलणाºयाची दुभाषी म्हणून मदत घेतली. त्यानेच चुलबूल यांच्याकडून माहिती काढून ती त्यांच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकली. त्याआधारे त्यांच्या दहिसर येथील उज्ज्वल यादव (२४) या नातवाने कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. १४ नोव्हेंबर रोजी नातू आणि आजोबांची पोलिसांनी बाबुरामच्या मदतीने भेट घडवून आणली. दहिसर येथून ते कळव्यात कसे भरकटले, हेही त्यांना सांगता येत नव्हते. आजोबा तीन दिवसांनी सुखरूप मिळाल्याने नातवाला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. एरव्ही, हद्दीवरून एखादा गुन्हा दाखल करताना १० वेळा विचार करणाºया पोलिसांसमोर कळवा पोलिसांनी एक आदर्श ठेवला आहे.महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाबुराम यादव यांचाही कळवा पोलिसांच्या वतीने बागडे यांनी छोटेखानी सत्कार केला. 

टॅग्स :thaneठाणेSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस