शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

मीरा - भाईंदर पालिका मुख्यालयातील नामफलक जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:16 IST

कसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

- राजू काळेभाईंदर - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.आचारसंहितेचा भंग ठरू नये, यासाठी निवडणूक आयोग सोशल मीडियावरील राजकीय प्रचारासह राजकीय बॅनर्सवरही नियंत्रण ठेवून आहे. सोशल मीडियावरील राजकीय प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष समिती स्थापन केल्याचेही सांगण्यात येतआहे. आचारसंहिता लागू होताच महानगरपालिकेने शहरातील बॅनर्स हटवण्यापासून ते राजकीय फलक, नामफलक, कोनशिला झाकण्यास सुरुवात केली आहे; मात्र या कारवाईत दुजाभाव केला जात असून पालिकेची कारवाई केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेने मुख्यालयातील मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या कोनशिला नुकत्याच झाकल्या; मात्र काही कोनशिला अद्याप झाकल्या नाहीत.पालिकेने किमान आदर्श आचारसंहितेचे तरी पालन करावे. सत्ताधाऱ्यांच्या भीतीपोटी ती बासनात गुंडाळू नये. राजकीय नामफलक व कोनशिला सरसकट त्वरित झाकल्या जाव्यात. अन्यथा, पालिकेविरुद्धच आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करू. - अनिल सावंत, काँग्रेस नगरसेवकआचारसंहिता १० मार्च रोजी लागू झाली. त्यामुळे पालिकेने कोनशिला आणि नामफलकांवर त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र आचारसंहिता लागू होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही पालिकेच्याच प्रशासकीय इमारतीतील राजकीय नामफलकांवर कारवाई झालेली नाही. हा नियम सत्ताधाºयांना लागू नाही की काय, असे वाटू लागले आहे.- नीलम ढवण, शिवसेना नगरसेविकाआचारसंहितेचे पालन करणे राजकीय पक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच बंधनकारक आहे. पालिका मुख्यालयातील राजकीय नामफलक झाकण्याचे राहून गेले असल्यास, ते आम्ही स्वत: झाकून टाकू. प्रशासनाकडून कारवाईसुद्धा सुरूच आहे. त्यांच्याकडून अनवधनाने राहून गेले असल्यास, ते लक्षात आणून देण्याऐवजी उगाच गाजावाजा केला जात आहे.- हसमुख गेहलोत, भाजपा गटनेतेपालिकेकडून शहरातील सर्व राजकीय कोनशिला व नामफलक झाकण्याची कारवाई सुरू आहे. ती येत्या एकदोन दिवसांत पूर्ण केली जाईल.- दीपक पुजारी, उपायुक्त (मुख्यालय)प्रवेशद्वाराजवळील कोनशिला झाकून पालिकेने कार्यतत्परता दाखवली असली, तरी याच मुख्यालयातील महापौरांपासून ते विविध समिती सभापतींच्या दालनाबाहेर लावण्यात आलेले नामफलक उघडेच ठेवले आहेत. पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने प्रशासनाने त्यांचे नामफलक झाकण्याचे धाडस केले नसल्याची टीका विरोधक करू लागले आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक