शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदावरून रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:02 IST

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात आहेत. तर निवडणूक काळात अन्य भागातून बदली होऊन आलेले आयुक्तालयातील १५ पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि काही सेकंड पीआय अश्या सुमारे १९ निरीक्षकांनी त्यांच्या कडील नुकताच दिलेला पोलीस ठाणे प्रभारीचा पदभार काढून घेण्याचा अन्याय होऊ नये म्हणून मॅट मध्ये धाव घेतली आहे.  त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. 

पोलीस आयुक्तालयात ३ वर्षां पेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर विलंबाने परंतु आचार संहिता सुरु झाल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. मुंबई आदी भागातून बदली होऊन आलेल्या ३६ पोलीस निरीक्षकांच्या ४ नोव्हेम्बर रोजी मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे आदी ठिकाणी नियुक्त्या केल्या गेल्या. 

 मिभा - ववी आयुक्तालयातून बदली झाल्याने अनेक नाराज अधिकारी यांनी मॅट मध्ये धाव घेतली. त्यावर सुनावणीची १४ जानेवारी रोजीची तारीख आहे. दरम्यान  पोलीस महासंचालक कार्यालयाने ३१ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षकांच्या बदली आदेशाने  मिभा - ववी आयुक्तालयातून निवडणूक काळात बदली होऊन गेलेल्या  संजय हजारे, जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत सरोदे, विलास सुपे, दिलीप राख व सुधीर गवळी ह्या ७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पुन्हा घरवापसी केली. 

घरवापसी केल्यानंतर ते अधिकारी ९ जानेवारी रोजी  मिभा - ववी आयुक्तालयात हजर झाले आहेत . त्या पोलीस अधिकाऱ्यांना ते आधी कार्यरत असलेली पोलीस ठाणी मिळण्याची आशा आहे. कारण त्यांची झालेली बदली ही अन्यायकारक होती असा त्यांचा दावा आहे. 

परंतु मुंबई आदी भागातून विधानसभा निवडणुकीत आलेले पोलीस निरीक्षक यांनी देखील त्यांना पोलीस ठाणे प्रभारी म्हणून असलेली जबाबदारी काढून घेऊन अन्याय करू नये म्हणून मॅट मध्ये दाद मागितली आहे. निवडणूक काळात शासनाचा आदेश मानून आम्ही कुठेही तक्रार न करता नेमणूक दिलेल्या जागी हजर झालो. आता नियुक्ती होऊन केवळ २ महिने होत नाहीत तोच पुन्हा प्रभारी पदावरून काढण्याची आणि परतलेल्या जुन्या अधिकाऱ्यांना नेमण्याची चर्चा त्यांच्यात आहे. 

एकूणच पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ वरिष्ठ निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात असतानाच २ महिन्यां पासून पोलीस ठाणे प्रभारी पदावर कार्यरत पोलीस निरीक्षकांनी देखील मॅट मध्ये धाव घेतल्याने पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यां मध्येच सामना रंगला आहे. पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे सह पोलीस आस्थापना मंडळ हे  योग्य आणि नियमानुसार निर्णय घेऊन विभागातील पोलीस अधिकाऱ्यांना खरंच न्याय कसा देणार? कि कोणावर अन्याय करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस