मांसाची वाहतूक करणारी क्वॉलीस जप्त
By Admin | Updated: October 4, 2016 02:09 IST2016-10-04T02:09:25+5:302016-10-04T02:09:25+5:30
जनावरांच्या १५० किलो मांसाने भरलेली क्वॉलीस वसईच्या पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सातीवली खीडीत सापडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने आरोपीला मारहाण

मांसाची वाहतूक करणारी क्वॉलीस जप्त
विरार : जनावरांच्या १५० किलो मांसाने भरलेली क्वॉलीस वसईच्या पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सातीवली खीडीत सापडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने आरोपीला मारहाण करून गाडीचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे गुजरात राज्यातील गोध्रातून वसईला जनावरांच्या मांसाचा पुरवठा होत असल्याचे उजेडात आले आहे.
गुजरात राज्यातील क्वॉलीस वसईच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद हायवेवर सातीवली खीडीतून शहराकडे जात असताना, तीचा टायर फुटून ती अचानक थांबली. या प्रकारामुळे एकमेकांवर धडकलेल्या मागील चार गाड्यातील प्रवासी क्वॉलीस चालकाला जाब विचारण्यासाठी गेल्यावर गाडीत जनावरांच्या मांसाने भरलेली गोणी त्यांना आढली. त्यामुळे संतप्त होवून जमावाने गाडीची तोडफोड करून चालक सोहेल गेज याला मारहाण केली. परिणामी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही कोंडी सोडवण्यासाठी वालीव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मांसाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. हे १५० किलो मांस आणि गाडी ताब्यात घेण्यात आली असून आरोपी सोहेलला अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)