शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय प्रसिद्धीसाठी महापौर मॅरेथॉनचा खटाटोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 02:03 IST

- धीरज परब, मीरा-भाईंदर जानेवारीमध्ये महापौर चषकाच्या नावाखाली तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केले गेले. त्यातून ...

- धीरज परब, मीरा-भाईंदरजानेवारीमध्ये महापौर चषकाच्या नावाखाली तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केले गेले. त्यातून खेळ आणि होतकरू खेळाडूंचे किती कल्याण झाले, हे सांगता येत नसले तरी त्या नावाखाली लोकप्रतिनिधींनी आपली राजकीय प्रसिद्धी मात्र पुरेपूर करून घेतली. अगदी मैदान व स्पर्धेची ठिकाणे महापौरांच्या छायाचित्रांच्या फलकांनी फुलून गेली होती. आता महापालिकेच्या माध्यमातून महापौर मॅरेथॉनची टूम सत्ताधाऱ्यांनी काढली आहे. यासाठी ६५ लाखांच्या खर्चाची तयारी चालवली आहे. जाहिरातबाजी स्पर्धेसाठी आहे की महापौरांसाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.पालिकेच्या खर्चातून आपली राजकीय चमकोगिरी करून घेण्याची लागणच सध्या सत्ताधाऱ्यांना झाली असून महापालिका प्रशासन केवळ जी हुजुरी करत आहे. बाकी साहित्य आदी खरेदी व खर्चामध्ये कोणकोण हात धुऊन घेतात, हा मुद्दा पुन्हा वेगळाच. शहरातील होतकरू खेळाडूंसाठी खरंच कळकळ असती आणि खेळाबद्दल प्रेम असते तर अशी उधळपट्टी करण्यापेक्षा चांगल्या प्रशिक्षणासह आवश्यक खेळाचे साहित्य, मैदान, तरणतलाव आदींची सोय करून दिली असती. महापालिकासेवेत मान्यवर खेळाडूंना सन्मानाने रुजू करून घेत त्यांचा अनुभव, प्रशिक्षणाचा फायदा शहरातील होतकरूंना करून दिला असता. पण, यासाठी प्रामाणिकपणा आणि मनातून तळमळ असावी लागते.जानेवारीत महापौर चषकाचे आयोजन सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या माध्यमातून केले होते. त्याआधी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री चषक झाला. मुख्यमंत्री चषकासाठी महापालिकेच्या ताब्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान महिनाभर अडकवून ठेवले. मंडप आणि जाहिरात फलकांचे तब्बल आठ लाखांच्या घरातील शुल्क अजूनही भाजपने महापालिकेत भरलेले नाही. मॅरेथॉनसाठी केवळ २३ लाखांची तरतूद शिल्लक आहे. ही स्पर्धा १८ आॅगस्टला होणार असली, तरी गेल्या महिन्यापासूनच वाद आणि टीकेच्या भोवºयात सापडली आहे.विकासकामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसा नाही, असे प्रशासन सांगते. एकीकडे विकासकामांना पैसा नाही, कर्जाचा वाढता डोंगर, नागरिकांवर करवाढीचा बोजा, त्यात कार्यक्रमांच्या आड मात्र राजकीय प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करायची, हे नागरिकांनी कुठपर्यंत सहन करायचे? मॅरेथॉन स्पर्धेसाठीही शहरभर जाहिरात फलक लावले आहेत. आणखी फलक लावले जाणार आहेत. त्यासाठी काही लाखांचा खर्च होणार आहे. या सर्व फलकांवर महापौरांची छायाचित्रे असून अगदी नमुना अर्जही सुटलेला नाही.खानपानापासून विविध व्यवस्थेच्या आड पालिकेच्या तिजोरीची लयलूट केली जाणार आहे. नियोजन, साहित्यपुरवठा आदींचे कंत्राट एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळा- महाविद्यालयांमधून शुल्क भरण्यास सक्ती केली जात आहे. २३ लाखांची तरतूद शिल्लक असल्याचे सांगितले जात असल्याने उर्वरित ४२ लाख कुठून आणणार, हा मोठा प्रश्न आहे. सत्ताधाºयांनी देणगीदारांमार्फत पैसा उभारण्याचे दावे केले असले, तरी तेवढे पैसे उभारले जातील, याची खात्री मात्र सत्ताधारी आणि प्रशासन दोन्ही द्यायला तयार नाहीत.विकासकामांसाठी पैसा नाही, अशी ओरड करत दुसºया बाजूला मॅरेथॉन स्पर्धा भरवून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी करत आहेत. त्याला प्रशासनाचीही साथ असल्याने कुणीही ब्र काढायला तयार नाही. अर्थात, मीरा-भार्इंदर पालिकेत हे काही नवीन नाही. यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून सत्ताधाºयांना याचा जाब विचारणे गरजेचे झाले आहे.आधी चांगल्या सुविधा पुरवाप्रशासनाने आधी शहरातील मैदाने सुधारावीत. भाड्याने दिलेल्या क्रीडासंकुलात विद्यार्थी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक तसेच होतकरूंना नि:शुल्क वा नाममात्र शुल्कात प्रोत्साहन द्यावे. महापालिकेमार्फतच दर्जेदार सुविधा, साहित्यासह प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण द्यावे. आज शहरातील अनेक लहानमोठी मुले चांगली सुविधा, प्रशिक्षण नाही म्हणून अन्य शहरांत लोकलचा जीवघेणा प्रवास करत आपला खेळ जोपासत आहेत. 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनthaneठाणे