शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

महापौरांचा घरचा आहेर, पूर्वानुभव खराब असल्याचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 05:24 IST

स्मार्ट सिटीसाठी आलेला ३८३ कोटींचा निधी खर्च न झाल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने यापूर्वीच ठाणे महापालिकेची कानउघाडणी केली आहे. त्यानंतर, आता पालिकेने या निधीचे नियोजन केले असून पालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या काही बड्या प्रकल्पांसाठी आता हा निधी वापरला जाणार आहे.

ठाणे : स्मार्ट सिटीसाठी यापूर्वी ४०० कोटींहून अधिक निधी महापालिकेला मिळाला होता. परंतु, त्यातील केवळ ७ कोटी रुपयेच खर्च झाले. आता पुन्हा ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी पूर्वानुभव लक्षात घेता नव्याने मंजूर निधीचा पालिका विनियोग करेल का, याबाबत अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असा घरचा आहेर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सोमवारी दिला.स्मार्ट सिटीसाठी आलेला ३८३ कोटींचा निधी खर्च न झाल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने यापूर्वीच ठाणे महापालिकेची कानउघाडणी केली आहे. त्यानंतर, आता पालिकेने या निधीचे नियोजन केले असून पालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या काही बड्या प्रकल्पांसाठी आता हा निधी वापरला जाणार आहे. तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत परिसर विकास आणि सर्व शहराचा विकास अशा दोन टप्प्यांत शहराचा विकास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्यानुसार, स्टेशन परिसराचा विकास करताना शहरातील कोपरी, किसननगर आणि राबोडीमध्ये क्लस्टर योजना राबवली जाणार आहे. परंतु, हे प्रकल्प राबवताना विविध विभागांच्या मंजुºया घेणे क्रमप्राप्त असल्यानेच या निधीचा विनियोग करता आला नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.ठाणे महापालिकेची २५ जून २०१६ रोजी स्मार्ट सिटीत निवड झाली. पालिकेला ३८३ कोटींचा निधी प्राप्त झाला. परंतु, तीन महिने उलटूनही या निधीचा विनियोगच केला नसल्याची माहिती उघड झाली. राज्य शासनाने पालिकेला या निधीचा वापर तातडीने करण्याचे आदेश दिले. पालिकेने केवळ सात कोटींचा निधी खर्च केला होता. याबाबत पालिका प्रशासनावर टीका होत आहे.- आता अलीकडेच झालेल्या ठाणे स्मार्ट सिटीच्या तिसºया बैठकीत नाले विकास प्रकल्प, मलनि:सारण, खाडीकिनारा संवर्धन आणि सुशोभीकरण, पादचाºयांसाठी विशेष प्रकल्प, तीनहातनाका परिसर सुधारणा प्रकल्प अहवाल तयार करणे, गावदेवी मैदान येथील भूमिगत वाहनतळ आणि नवीन रेल्वेस्टेशन आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ३०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी अगोदर मंजूर झालेल्या निधीचा विनियोग न झाल्याचे मान्य केले. हा निधी मार्च महिन्याच्या आसपास पालिकेकडे आला होता. परंतु, त्या काळात महापालिका निवडणुका, विविध समित्यांचे गठण आणि इतर कारणांमुळे निधीचा विनियोग होऊ शकला नसल्याचे स्पष्ट केले. आता मात्र तसे होणार नाही. ज्याज्या योजनांसाठी निधी देण्यात आला आहे, तो खर्च केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.माझ्या कार्यकाळात स्मार्ट सिटीसाठी एवढा निधी मिळाला, याचा मला आनंद आहे. परंतु, या निधीचा वापर जेव्हा होईल आणि विविध प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील, तेव्हाच खरा आनंद होईल, असा टोला महापौर शिंदे यांनी लगावला. आम्ही प्रस्ताव मंजूर करतो, त्यावर स्वाक्षºया करतो, परंतु यापूर्वीचा अनुभव पाहता कामे वेळेत होतील का, याबाबत मात्र आताच शाश्वती देता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या. महापौरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे चव्हाण यांच्यासह उपस्थित अधिकारी गोरेमोरे झाले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका