फेरीवालाविरोधी आंदोलनात महापौरही

By Admin | Updated: May 30, 2017 05:52 IST2017-05-30T05:52:57+5:302017-05-30T05:52:57+5:30

शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात युवासेनेने पुन्हा सोमवारी रात्री आंदोलनाचा पवित्रा घेतला. महापौर राजेंद्र देवळेकर

Mayor in protest against hawkers | फेरीवालाविरोधी आंदोलनात महापौरही

फेरीवालाविरोधी आंदोलनात महापौरही

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात युवासेनेने पुन्हा सोमवारी रात्री आंदोलनाचा पवित्रा घेतला. महापौर राजेंद्र देवळेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यात सहभागी होत आठवडाबाजारातील फेरीवाल्यांना हुसकावून लावले. दरम्यान, शिवसेना सोमवारीच आंदोलने छेडत असल्याने आठवडाबाजारावर त्यांचा डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केडीएमसीत शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवणे, फेरीवाला धोरण राबवणे, यापैकी त्यांना काहीच जमलेले नाही. विरोधी पक्ष असलेली मनसे विविध समस्यांवर आंदोलने छेडत असतानाच सत्ताधारी शिवसेनेलाही फेरीवाल्यांच्या मुद्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सोमवारच्या आंदोलनात युवासेना जिल्हा अधिकारी व नगरसेवक दीपेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Mayor in protest against hawkers