ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडलं 'गाण्यातील गणित', हसत खेळात शिकले गणित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:07 PM2020-02-17T17:07:12+5:302020-02-17T17:10:05+5:30

अभिनय कट्ट्यावर गाण्यातलं गणित कार्यक्रम पार पडला. 

'Mathematics in song' revealed in Thane's acting line, learned mathematics in smiling sports | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडलं 'गाण्यातील गणित', हसत खेळात शिकले गणित 

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडलं 'गाण्यातील गणित', हसत खेळात शिकले गणित 

Next
ठळक मुद्दे अभिनय कट्ट्यावर उलगडलं 'गाण्यातील गणितहसत खेळात शिकले गणित  गणित ह्या विषयाच आपल्या आयुष्यातील स्थान खूप महत्वाचं - किरण नाकती

ठाणे : अभिनय कट्टा क्रमांक ४६८ म्हणजे ठरलं किचकट डोक्याला त्रास देणार अहो लहान मुलाचं नव्हे मोठ्यांनाही नकोनकोस वाटणार 'गणित' अगदी हसत खेळत चक्क गाण्यातून अगदी सोपं होऊन उलगडलं. औचित्य होते गणित स्वयंसेवक संघ आयोजित 'गाण्यातील गणित' ह्या कार्यक्रमाचे.

   आपल्याला माहीत असलेल्या अनेक गाण्यांमध्ये गणिताच्या विविध संज्ञा लपलेल्या असतात हे काल अभिनय कट्ट्यावर गणित स्वयंसेवक संघाच्या बाळ कलाकारांनी सर्व रसिक प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिले. मस्ती की पाठशाळा,माय नेम इस अँनथोनी,गिव मी सम सनशयिन आशा विविध गीतांमध्ये लपलेल्या विविध गणिती संज्ञा कळत नकळत उपस्थित प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिल्या.विशेष म्हणजे गणित स्वयंसेवक संघाचे हे सर्व बालकलाकार हे मुंबईतील विविध सरकारी शाळातील हे विद्यार्थी आहेत. *गणित स्वयंसेवक संघचे मयूर अंकोलेकर ह्यांच्या संकल्पनेतून आलेल्या ह्या कार्यक्रमाला रुचिरा पिंगुळकर,निकिता प्रभू,श्रुती शेट्टी,देवीना निकम,नृपल सानील,शुभम शिंत्रे,हेत गोसार,कृनाल नागडा,कानात जैन,श्रीजिथ नायर या स्वयंसेवकांनी सत्यात उतरवण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला.* गणित स्वयंसेवक संघ सरकारी शाळांमध्ये मुलांना गणित सोपं होण्यासाठी असे विविध कलाकार राबवत असतात.त्यातीलच हा एक सांगीतिक उपक्रम. सदर कार्यक्रमात *तन्वी दासगावकर,श्रुती जाधव,आयुष राजपूत,विक्रम गौतम,प्रीती राय,अंजली गुप्ता,आराधना उल्लेकर,रुकसना अन्सारी,मुफिदा अन्सारी,सुहाना अन्सारी,रिया यादव,कांचन कुर्मी,आलिशा देवप्रसाद,सविता गायकवाड,नूरजहाँ अन्सारी,निखात शेख* ह्यांनी सहभाग घेतला.गाण्यातील गणित ह्या नृत्यविष्काराचे नृत्यदिग्दर्शन *मल्लिका समंथा* ह्यांनी केले. ह्या सोबतच *अभिनय कट्ट्याच्या संस्कार शास्त्रातील सलोनी पाटील,अभिनव पांडे, दर्शना पाटील,वैष्णवी पाटील,रामदास शिंदे आणि विश्रांती मदने ह्यांनी विविध कवितांचे अभिवाचन केले.* तसेच *अभिनय कट्टा बालसंस्कार  शास्त्राच्या २५ बालकलाकारांनी चिल चिल चिल्लाके ह्या गाण्यावर भन्नाट नृत्याभिनय सादर केला*.सदर सादरीकरणाला उपस्थितांची विशेष दाद मिळाली.संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख निवेदन अभिनय कट्ट्याची कलाकार सलोनी पाटील हिने केले. अभिनय कट्ट्याने आमच्या ह्या उपक्रमाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आमच्या प्रत्येक उपक्रमासाठी आमच्या स्वयंसेवकांसोबतची मेहनतबसते त्यांच्यामुळेच हे शक्य तसेच अभिनय कट्टा नेहमीच आमच्या कलाविष्काराला रंगमंच उपलब्ध करून प्रोत्साहन देतो असे  गणित स्वयंसेवक संघाचे मयूर अंकोलेकर आणि रुचिरा पिंगुळकर ह्यांनी ह्यांनी व्यक्त केले. गणिताकडे पाहून आपण नाक मुरडतो पण ह्या विषयाच आपल्या आयुष्यातील स्थान खूप महत्वाचं आहे.ह्या गणिताला सोपं करून कसं शिकायचं ह्याच्या नवीन संकल्पना गणित स्वयंसेवक संघ नेहमी भन्नाट रित्या मांडतो.आजचा सांगीतिक कलाविष्कार अद्भुत होता आशा उपक्रमाला अभिनय कट्टा नेहमी सोबत असेल असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

Web Title: 'Mathematics in song' revealed in Thane's acting line, learned mathematics in smiling sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.