साहित्य चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:47+5:302021-03-28T04:37:47+5:30

ठाणे : नौपाड्यातील नामदेवीवाडी हॉलजवळ असलेल्या एका मॉलच्या शाखेच्या शटरचे साइड लॉक तोडून अज्ञात चोराने तेथून सुमारे पाच ...

Material stolen | साहित्य चोरीला

साहित्य चोरीला

ठाणे : नौपाड्यातील नामदेवीवाडी हॉलजवळ असलेल्या एका मॉलच्या शाखेच्या शटरचे साइड लॉक तोडून अज्ञात चोराने तेथून सुमारे पाच हजारांचे टी-शर्ट, बेडशीट, मिनी चॉपर आदींसह इतर माल चोरून नेला आहे. ही घटना २५ मार्चच्या रात्री घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

-------------------

दोन दुचाकी चोरीला

ठाणे : खारेगाव कळवा या भागात इमारतीच्या खाली विकास देसाई यांनी दुचाकी उभी केली होती; परंतु अज्ञात चोराने ती चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही घटना २३ ते २४ मार्चदरम्यान घडली, तर दुसऱ्या एका घटनेत चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी पार्क करून ठेवलेली दुचाकीदेखील चोरीला गेली आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Material stolen