मीरारोड मध्ये अनधिकृत झोपड्यांना भीषण आग, गॅस सिलेंडरचा स्फोट

By धीरज परब | Updated: May 29, 2025 22:57 IST2025-05-29T22:56:24+5:302025-05-29T22:57:48+5:30

मीरारोडच्या शीतल नगर भागातील कॉस्मोपॉलिटिन शाळेच्या लागत मोकळ्या भूखंडात एका विकासकाने बांधकाम मजुरांना राहण्यासाठी झोपड्या केल्या होत्या.

Massive fire breaks out in unauthorized huts in Mira Road, gas cylinder explodes | मीरारोड मध्ये अनधिकृत झोपड्यांना भीषण आग, गॅस सिलेंडरचा स्फोट

मीरारोड मध्ये अनधिकृत झोपड्यांना भीषण आग, गॅस सिलेंडरचा स्फोट

मीरारोड- मीरारोडच्या शीतल नगर भागात एका विकासकाने बांधकाम कामगारांना राहण्यास केलेल्या अनधिकृत झोपडपट्टीत गुरुवारी आग लागून एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने जीवित हानी झाली नसून या झोपडपट्टीला लागलेल्या आगी बद्दल काहींनी संशय देखील व्यक्त केला आहे तर भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी तर ह्यात बांगलादेशी नागरिक रहात असल्याचा आरोप करून कारवाईची मागणी केली आहे. 

मीरारोडच्या शीतल नगर भागातील कॉस्मोपॉलिटिन शाळेच्या लागत मोकळ्या भूखंडात एका विकासकाने बांधकाम मजुरांना राहण्यासाठी झोपड्या केल्या होत्या. तर सदर झोपड्या अनधिकृत असल्याची तक्रार पालिके कडे काही महिन्या आधी झाली होती.  गुरुवारी झोपडयांना आग लागली. झोपड्यां मध्ये अनेक गॅस सिलेंडर होते. त्यातील एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात  पसरले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गॅस सिलेंडर बाहेर काढले व आग आटोक्यात आणली. झोपड्यातील मजूर हे कामावर गेले असल्याने आत कोणी नव्हते. त्यामुळे जीवित हानी टळली. तर रस्त्या वरील वाहन पार्किंग मुळे अग्निशमन दलास आगीच्या ठिकाणी पोहचण्यास अडथळा झाला. 

शिवसेना शिंदे गटाचे सजी आयपी यांनी आगीची माहिती देतानाच आग नेमकी कशा मुळे लागली? कि लावली गेली? असे प्रश्न उपस्थित केले. आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. तसेच ह्या झोपडपट्टीत काही बांगलादेशी रहात असल्याचा आरोप करून या प्रकरणी कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. 

Web Title: Massive fire breaks out in unauthorized huts in Mira Road, gas cylinder explodes