- पंकज पाटीलअंबरनाथ - अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीत श्री गणेश केमिकल्स कंपनीमध्ये सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान मोठी आग लागली. या आगीनंतर कंपनीत रासायनिक ड्रमचे मोठमोठे स्फोट होऊ लागल्याने संपूर्ण आनंद नगर एमआयडीसीमध्ये भीषणता निर्माण झाली होती.
श्री गणेश केमिकल्स कंपनीत अचानक आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले. या कंपनीत रासायनिक साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक स्फोट कंपनीत झाले. या स्फोटांचा हादरा दोन किलोमीटर अंतरापर्यंत कंपन्यांना जाणवला. एवढेच नव्हे तर कंपनीच्या परिसरात असलेल्या इतर कंपन्यांमध्ये देखील ही आग आल्याने एकच आहाकर माजला होता.
कंपनीतील ड्रमचे स्फोट झाल्यानंतर संपूर्ण रासायन एमआयडीसीच्या रस्त्यावर पसरले होते त्या ठिकाणी देखील रस्त्यावर आग लागली होती. आगीचा रौद्ररूप पाहून एमआयडीसी अग्निशमन केंद्राने जिल्ह्यातील सर्वच महापालिका आणि औद्योगिक क्षेत्रांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत मागितली. या आगीत नेमके किती जण जखमी झाले आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
Web Summary : A massive fire broke out at Shree Ganesh Chemicals in Ambernath MIDC, causing explosions and spreading to nearby companies. Chemical drums exploded, igniting the roads. Firefighters sought assistance from surrounding areas. The number of injuries is currently unknown.
Web Summary : अंबरनाथ एमआईडीसी में श्री गणेश केमिकल्स में भीषण आग लग गई, जिससे विस्फोट हुए और आग आसपास की कंपनियों में फैल गई। रासायनिक ड्रमों में विस्फोट से सड़कों पर आग लग गई। दमकल कर्मियों ने आसपास के क्षेत्रों से सहायता मांगी। घायलों की संख्या अभी अज्ञात है।