शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लास्टिक वापरू नका’च्या बोर्डवरच प्लास्टिकचे डबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 08:59 IST

टिकुजिनीवाडीतील वनविभागाच्या जागेवर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असताना आता टिकुजिनीवाडी परिसरात वनविभागाने आपल्या हद्दीत लावलेल्या फलकावर ‘अतिक्रमण करू नका, प्लास्टिक वापरू नका’ अशी सूचना ठळक अक्षरात लावली आहे. परंतु दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे त्या फलकालाच भंगारातील प्लास्टिक डबे लटकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. फलकाच्या बाजूला म्हणजेच वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. येथून रोजच्या रोज ये-जा करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र कदाचित ते अतिक्रमण दिसत नसावे.

टिकुजिनीवाडीचा परिसर डोंगराळ आहे. याठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द सुरू होते. परंतु मागील काही वर्षांत या भागात  झपाट्याने विकास झाला. अगदी वनविभागाच्या हद्दीलगत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी आपली हद्द कुठून सुरू होते, हे समजावे याकरिता त्या ठिकाणी फलक लावले आहेत. या फलकावर ‘अतिक्रमण करू नका’, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच या क्षेत्रात प्लास्टिक वापरू नये, वृक्षतोड करू नये असे फलकावर नमूद केले आहे. त्यामुळे वन्यजीवांना धोका पोहोचू शकतो. 

त्यामुळे असे केल्याचे आढळल्यास कमीत कमी २५ हजारांचा दंड तसेच ३ ते ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो, असेही लिहिले आहे. मात्र, अतिक्रमण करणाऱ्यांनी या फलकावरील सूचना ना वाचल्या आहेत ना त्यांना कायद्याची जराही भीती आहे. या फलकावर चक्क प्लास्टिकच्या डब्यांची माळ घातली आहे. मात्र ती डब्यांची माळ हटविण्याचे धाडस वनविभाग दाखवत नाही. 

हाकेच्या अंतरावरच कार्यालय

दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, टिकुजिनीवाडी येथे अतिक्रमण केले आहे. हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय आहे. अधिकारी वर्ग याच रस्त्यावरून रोज ये-जा करतात. परंतु त्यांना ही अतिक्रमणे दिसत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात वनविभागाच्या संबंधित कार्यालयाशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :thaneठाणेPlastic banप्लॅस्टिक बंदी