विक्रमगड तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा
By Admin | Updated: February 11, 2017 03:45 IST2017-02-11T03:45:31+5:302017-02-11T03:45:31+5:30
तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल दिवसेंदिवस ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी नागरिक पाणी

विक्रमगड तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा
विक्रमगड : तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल दिवसेंदिवस ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी नागरिक पाणी, वीज, रोजगार, निवारा, शिक्षण, रस्ते या मुलभुत सुविधा अभावी समस्यांनी ग्रासले आहेत़ त्यामुळे शुक्रवारी विक्रमगड तहसील कार्यालयावर नव्याने सुरु झालेल्या भारतीय क्रांतीकारी मार्क्सवादी पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार सुरेश सोनवणे यांना मागण्यांचे निवदेन दिले़ यावेळी निवेदनांत म्हटल्याप्रमाणे वर्ष २००५ चा वनहक्क कायदा आमंलात आणला त्याची सरकारने काटेकोरपणे अंमलबजावनी करावयास हवी, त्याचप्रमाणे अदयापर्यत अशी अंमलबजावणी योग्यरित्या झालेली नाही़
येथील आदिवासीं वनवासींना ते कसित असलेले वनपट्टे मिळावेत. वनदावे दाखल करुनही त्याना न्याय मिळत नसल्याने त्यांचेकडून संताप्त व्यक्त केला जात आहे़ ज्यांना जमीन मिळाली ती तुटपुंजी आहे़ त्यामुळे कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार जमीन नांवे झाली पाहीजे़ रोजगारासाठी स्थानिक प्रशासनाकडून आतापासूनच कामांचा आराखडा तयार करुन त्वरीत कामे सूरु झाली पाहीत़ (वार्ताहर)