शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चारित्र्याच्या संशयाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: February 28, 2019 19:28 IST

चारित्र्यावरील संशयाच्या कारणावरुन पतीबरोबर नेहमीच भांडणे होत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनिषा उर्फ प्रियंका गुजर (२७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्यात घडली.

ठळक मुद्दे शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर उघड झाला प्रकार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पतीबरोबर नेहमीच व्हायचा वाद

ठाणे: पतीसोबत होणाऱ्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून मनिषा उर्फ प्रियंका संदेश गुजर (२७, रा. पिंगळे चाळ, नितीन कंपनी, गणेशवाडी, ठाणे )या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनिषा आणि संदेश यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. त्यांना एक सात वर्षांची मुलगीही आहे. तिच्या चारित्र्यावर तो नेहमीच संशय घेत असे. यातूनच दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. एक दोन वेळा हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेले होते. नातेवाईक, शेजारी तसेच पोलीस यांनीही त्यांची याआधी समजूत घातली होती. मात्र, संशयाच्या भूताने पछाडल्यामुळे तो नेहमीच तिला मोबाईल मागत असे. मोबाईलचा पासवर्डही मागायचा. तिने मोबाईल न दिल्यामुळेही त्यांचा वाद विकोपाला जात होता, अशी माहिती पोलीस चौकशीमध्ये पुढे आली आहे. २८ फेब्रुवारी नेहमीप्रमाणे तो सकाळी कामाला गेला होता. तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळपासून घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजारच्यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा वाजविला. त्यांच्यापैकीच एकाने खिडकीतून आत पाहिले तर तिने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबतची माहिती नौपाडा पोलिसांना देण्यात आली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या