विवाहितेने मुलीसह केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:50 IST2018-08-05T02:50:32+5:302018-08-05T02:50:34+5:30

घरगुती भांडणातून एका विवाहितेने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीसह भार्इंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या केली.

Married woman committed suicide | विवाहितेने मुलीसह केली आत्महत्या

विवाहितेने मुलीसह केली आत्महत्या

मीरा रोड : घरगुती भांडणातून एका विवाहितेने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीसह भार्इंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या केली. भार्इंदर पूर्वेला नवघर गावामागील गावदेवी चाळीत यादव कुटुंब राहतात. त्या चाळीत राहणाऱ्या रेणू यादव (२७ ) या विवाहितेने आपली साडेतीन वर्षांची मुलगी आरोहीसह लोकल समोर उडी घेऊन आत्महत्या केली. विरारहून वांद्रेला जाणारी लोकल भार्इंदर स्थानकात फलाट चारवर आली.
लोकल भार्इंदर स्थानकातून सुटून वेग घेताच रेणूने मुलीसह लोकल समोर उडी मारली. रेणू काही महिन्यांपूर्वीच मुलीसह पतीकडे राहायला आली होती. पती पिंटू हा शिर्डीला जाणार असल्याचे म्हणत होता.
पण रेणूने त्याला एकटे जाण्यास विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्या भांडणातून आत्महत्या केली असे रविवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Married woman committed suicide