विवाहितेला ढकलले वेश्या व्यवसायात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:02 IST2018-08-05T02:02:01+5:302018-08-05T02:02:03+5:30
लहान वयात लग्न झालेल्या विवाहितेस तिचा पती व सासरच्यांनी आॅर्केस्ट्रा बार तसेच वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पती, त्याचा मित्र व दलालास अटक केली आहे.

विवाहितेला ढकलले वेश्या व्यवसायात
मीरा रोड : लहान वयात लग्न झालेल्या विवाहितेस तिचा पती व सासरच्यांनी आॅर्केस्ट्रा बार तसेच वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पती, त्याचा मित्र व दलालास अटक केली आहे. सासू, सासरा, मामा व अन्य तीन अशा सहा आरोपींचा शोध सुरू आहे.
मूळच्या पश्चिम बंगालच्या सिलिगुडीची राहणारी एकोणीसवर्षीय विवाहितेचे लग्न ती १४ वर्षांची असतानाच मीरा रोडच्या शांती पार्क भागातील एका आॅर्केस्ट्रा बारशी संबंधित कुटुंबात लावून दिले. तिला आॅर्केस्ट्रा बारमध्ये बारबाला म्हणून कामाला पाठवण्यासह वेश्या व्यवसायालाही पती व सासरच्यांनी लावले. चार ते पाच वेळा तिचा गर्भपात करण्यात आला. पतीचा मित्र व दलालामार्फत तिला वेश्या व्यवसायाला पाठवले जात होते.