मुल-बाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:55 IST2019-12-24T00:54:29+5:302019-12-24T00:55:02+5:30
दर्शना योगेश पाटील (२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आ

मुल-बाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
भिवंडी : लग्नाला चार वर्षे उलटूनही मूलबाळ नसल्याने विवाहितेचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी नारपोली पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शना योगेश पाटील (२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मृत दर्शना हिचे (रा. कोनगाव) हिचे १२ एप्रिल २०१६ मध्ये अलीमघर येथील योगेश पाटील याच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षे सुखाचा संसार केला. मात्र, दर्शनाला मूलबाळ होत नसल्याने तिचा तिचा पती योगेश, सासरा रवींद्र आणि सासू जया यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. अखेर, तिने टोकाचे पाऊ ल उचलत घरात कुणी नसताना ती १८ डिसेंबरला विष प्यायली. पती घरी आल्यावर त्याला दर्शना बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली.
त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला कळव्याच्या शिवाजी रु ग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी अधिक तपास करत आहेत.