शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी लग्न मोडणारा नवरदेव अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 21:18 IST

लाखोंचा खर्च करून आपल्या मुलीचा साखरपुडा केला. मात्र नवरदेवासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याची केलेली मागणी पूर्ण करता न आल्याने ठरलेले लग्न मोडल्याची घटना कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात उघडकीस आली.

कल्याण - लाखोंचा खर्च करून आपल्या मुलीचा साखरपुडा केला. मात्र नवरदेवासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याची केलेली मागणी पूर्ण करता न आल्याने ठरलेले लग्न मोडल्याची घटना कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक केली आहे.

      सदर पिडीत मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिम चिकण घर परिसरात राहते. या तरुणीचे भिवंडी काल्हेर गावात राहणाऱ्या संतोष पाटील (25)  या तरुणाशी विवाह ठरला होता .त्यांचा 11 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता तसेच यावेळी 7 मे हि लग्नाची तारीख ठरली होती .साखरपुड्याच्या दोन दिवसांनी संतोष व त्याचे कुटुंबीय मुलीच्या घरी आले त्यांनी साखरपुड्यात तरुणीला दिलेले दागिने बहाण्याने परत नेले. त्यानंतर तरुणीच्या घरी फोन करत रोकड, गाडी व सोने असे मिळून एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र परीस्थित बेताची असल्याने आपण हे देवू शकत नसल्याचे तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर पाटील यांनी ठरलेल्या लग्नास नकार दिला.याप्रकरणी मुलीच्या कुटुंबाने महात्मा फुले पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी  या प्रकरणी गुन्हा दखल करत संतोष पाटील याला अटक केली. संतोषला आज कल्याण न्यालयात हजर करण्यात आले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण वाघ करीत आहेत...

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्या