हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:57 IST2019-07-15T05:57:09+5:302019-07-15T05:57:13+5:30

विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने पतीसह सासू व नणंदेविरोधात भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Marriage of Marriage for Dowry | हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

भिवंडी : कापडाचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख आणावेत, यासाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने पतीसह सासू व नणंदेविरोधात भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पती हुसेन सलीम शेख, सासू मुमताज, नणंद रुकसार अशी सासरच्या मंडळींची नावे आहेत. मुस्कान हिचा विवाह २०१८ मध्ये मालाड येथील हुसेन शेख याच्याशी झाला. विवाहानंतर काही दिवसांतच हुसेन याने कापडाचे दुकान टाकायचे आहे, असा बहाणा करून मुस्कानकडे पैशांचा तगादा लावला होता.

Web Title: Marriage of Marriage for Dowry