कल्याणमध्ये विवाहितेचा जाळून घेऊन मृत्यू

By Admin | Updated: May 1, 2017 05:55 IST2017-05-01T05:55:27+5:302017-05-01T05:55:27+5:30

शहराच्या पश्चिम भागातील चिखलीबागेत राहणाऱ्या हेमा सूरज गुप्ता या विवाहीतेने सासरच्या जाचाला कंटाळून अंगावर

Marriage and death in Kalyan | कल्याणमध्ये विवाहितेचा जाळून घेऊन मृत्यू

कल्याणमध्ये विवाहितेचा जाळून घेऊन मृत्यू

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील चिखलीबागेत राहणाऱ्या हेमा सूरज गुप्ता या विवाहीतेने सासरच्या जाचाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. या घटनेत हेमा हिचा मृत्यू झाला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सूरज आणि दीर सागर गुप्ता यांच्यासह सासूच्या विरोधात
महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  या पैकी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. या प्रकरणी  हेमाचे नातेवाईक रमाशंकर गुप्ता  यांनी फिर्याद दिली आहे. सासरच्या जाचाला कंटाळूनच हेमाने रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage and death in Kalyan