चरस विकणाऱ्यास मुंब्य्रातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST2021-09-17T04:48:11+5:302021-09-17T04:48:11+5:30
मुंब्रा : येथील कौसातील एका खासगी रुग्णालयाच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात चरस हा अमली पदार्थ विकण्यासाठी एक ...

चरस विकणाऱ्यास मुंब्य्रातून अटक
मुंब्रा : येथील कौसातील एका खासगी रुग्णालयाच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात चरस हा अमली पदार्थ विकण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांच्या पथकाने मानव हजरती (वय २३, रा. अमृत हेवन गृहसंकुल, खडकपाडा, कल्याण) या तरुणाला शनिवारी अटक केली. त्याच्याकडे एक किलो ३५ ग्रॅम वजनाचा चार लाख ५५ हजार रुपये किमतीचा चरस हा अमली पदार्थ मिळून आला. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने चरस कोणाकडून आणला होता, तो कुणाला विकणार होता, याचा तपास उगलमुगले करीत आहेत.
........