शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

मेट्रो स्थानकाच्या मेडतीया नगर स्थानका नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:34 IST

Mira Road: मीरारोडच्या मेडतीया नगर मेट्रो स्थानकाचे नाव रद्द करून "सेनापती कानोजी आंग्रे"  किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.

मीरारोड- मीरारोडच्या मेडतीया नगर मेट्रो स्थानकाचे नाव रद्द करून "सेनापती कानोजी आंग्रे"  किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. एमएमआरडीएने मराठीद्वेष्टेपणा दाखवत बिल्डरच्या नावलौकिकसाठी हा प्रकार केल्याचा आरोप समितीने केली असून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

मीरा भाईंदर मेट्रो ९ चे काम सुरु असून येथील स्वातंत्र्य वीर सावरकर चौक येथील मेट्रो स्थानकास मेडतीया नगर असे नाव एमएमआरडीए ने दिले आहे. वास्तविक ह्या ठिकाणी आधी पासूनच महापालिकेने स्वातंत्र्य वीर सावरकर चौक असे ह्या मुख्य चौकास नाव दिलेले आहे. आणि त्या ठिकाणी होणाऱ्या मेट्रो स्थानकास मात्र एमएमआरडीएने स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नाव डावलून जाणीवपूर्वक मेडतीया नगर असे नाव दिल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.

स्वातंत्र्य वीर सावरकर चौक  शिवाय सर्वोदय संकुल, गोल्डन नेस्ट संकुल हि परिसरातील प्रचलित नावे देखील आहेत. मात्र एमएमआरडीएने मेडतिया बिल्डरचे प्रचलित नसलेले मेडतीया नगर हे नाव मेट्रो स्थानकास देण्याचा कोणता अर्थपूर्ण शहाणपणा साधला? ह्याची चौकशी करण्याची मागणी देखील देशमुख यांनी केली.

देशमुख, उपाध्यक्ष प्रमोद पार्टे, सरचिटणीस कृष्णा जाधव शहर अध्यक्ष सचिन घरत, सचिव सिद्धेश पाटील, दीपेश सरोदे, प्रतीक सुर्वे, संतोष पाटील आदींच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मेट्रो प्रशासनाला निवेदन देऊन मेडतीया नगर रद्द करून  "सेनापती कानोजी आंग्रे"  किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी केली आहे. 

मराठा साम्राज्य आरमार प्रमुख शूर सेनापती कान्होजी आंग्रे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रकार्य, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि मराठी अस्मिता लक्षात घेता त्यांच्या पैकी एक नाव सदर मेट्रो स्थानकास द्यावे असे शिष्टमंडळाने एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे.  

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरMetroमेट्रोthaneठाणे