सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरांत प्रथमच मराठी व सिंधी बांधवाची विश्वास व विकासासाठी महागठबंधन झाले आहे. मराठी व सिंधी म्हणजे वडापाव व दाल पकवान सोबत आले असून विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोलमैदान येथिल सभेत व्यक्त केला.
उल्हासनगर गोलमैदान येथे शिंदेसेना व सहकारी पक्षाच्या सभेचे आयोजन शनिवारी सायंकाळी ५ वाजता केले होते. मात्र सभा सव्वा सात वाजता सुरू झाली. सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरांत ओमी कलानी टीमने शिवसेनेवर विश्वास दाखवून दोस्ती का गठबंधन सुरू केल्याचे सांगितले. महापालिकेवर शिवसेना, ओमी टीम व साई पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी शिवसेना, ओमी टीम, साई पक्षासह अन्य पक्ष एकत्र आल्याचे सांगितले. सिंधी समाज व्यापारी व उघोगशील असून त्यांनी उल्हासनगरचा नावलौकिक राज्यात नव्हेतर देशात वाढविले आहे. शिवसेना, ओमी कलानी टीम, साई पक्ष हा विकासाचा अजेंडा असून पप्पू कलानी यांच्या आजही दम आहे. मुख्यमंत्री असताना १४०० कोटीचा निधी शहराला दिला असून यापुढे विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगून त्यांनी सभेत भाजपावर टिका करणे टाळले आहे.
शहरांत कॅशलेस हॉस्पिटल सुरू करून गरीब व गरजू नागरिकांसाठी महात्मा फुले आरोग्यदायक योजना सुरू केल्याने मोफत उपचार होत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अमृत योजने अंतर्गातील ५४३ कोटीची पाणी पुरवठा योजना, २४२ कोटीची पाणी पुरावठा योजना, एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून रस्ते आदी जुन्याच योजना व उपक्रमाचे वाचन शिंदे यांनी वाचून दाखविले. तसेच नगरविकास विभागातून पैसे देणार म्हणजे देणार हे माझे हे कंमेंटमेन्ट असल्याचे ते म्हणाले. तसेच लाडकी बहिणी योजना बंद पडू देणार नसल्याचे ते म्हणाले. सभेला पीआरपीचे नेते जयदीप कवाडे, माजी आमदार पप्पू कलानी, जीवन इदनानी, ओमी कलानी आदीजण उपस्थित होते.
भविष्यात काय देणार शहराला वाढीव ५० एमएलडी पाणी, रस्ते, गार्डन, शाळा, हॉस्पिटल तसेच व्यापार वाढविणार, विविध उपक्रम व योजना, धोकादायक इमारत पुनर्वविकास, क्लस्टर योजना, एसआरए, ७२१ कोटीची ३ हजार घरांची आवास योजना, अवैध बांधकाम नियमित करणे आदीचे आश्वासन दिले.
महिला उठल्यात, तीन दिवस पाणी येणार नाही सभेला अडडीच तास उशिर आल्याने, काही महिला सभेतुन उठत जात होत्या. त्यावेळी सभेचे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी महिलांनी उठून जाऊ नये. जे महिला उठून जातील त्यांना तीन दिवस पाणी येणार नसल्याची अप्रत्यक्ष धमकी दिली.
Web Summary : Eknath Shinde promised Ulhasnagar development funds, emphasizing Marathi-Sindhi unity. He highlighted ongoing projects and future plans including housing and infrastructure improvements. A threat regarding water supply was made to women leaving the late meeting.
Web Summary : एकनाथ शिंदे ने उल्हासनगर के विकास के लिए धन का वादा किया, मराठी-सिंधी एकता पर जोर दिया। उन्होंने आवास और बुनियादी ढांचे में सुधार सहित चल रही परियोजनाओं और भविष्य की योजनाओं पर प्रकाश डाला। देर से मीटिंग छोड़ने वाली महिलाओं को पानी की आपूर्ति रोकने की धमकी दी गई।