शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

उल्हासनगरातील चौकाच्या नामांतरावरून मराठी-सिंधी वाद? थेट विधानसभा अध्यक्षांकडे, समन्वयाने मार्ग काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 7:07 PM

Ulhasnagar News : उल्हासनगर कॅम्प नं- ५ येथील नेताजी चौकाचे नामकरण धर्मवीर आनंद दिघे असे झाले. महापालिका महासभेत तसा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र कालांतराने चौकाचे नामांतरण साई गुरुमुखदास ठेवण्याचा ठराव येऊन मंजूर झाला.

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील चौकाच्या नामांतरावरून सिंधी- मराठी वाद उभा ठाकला असून यातून मार्ग काढण्यासाठी थेट विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्या कक्षात बैठक झाली. बैठकीला माजी उपमहापौर जया साधवानी, आयुक्त डॉ राजानिधी यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते. समन्वयाने मार्ग काढण्याच्या सूचना यावेळी विधानसभा अध्यक्ष पाटोले यांनी दिल्याची माहिती जया साधवानी यांनी दिली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं- ५ येथील नेताजी चौकाचे नामकरण धर्मवीर आनंद दिघे असे झाले. महापालिका महासभेत तसा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र कालांतराने चौकाचे नामांतरण साई गुरुमुखदास ठेवण्याचा ठराव येऊन मंजूर झाला. यावेळी काही नगरसेवकांनी चौकाचे नामांतरण धर्मवीर आनंद दिघे असे झाल्याची आठवण करून दिली. त्यावेळी चौकाचे नामांतर यापूर्वी झाले असेलतर, दुसरा नामांतराचा ठराव रद्द होईल. असे सांगण्यात आले. मात्र कालांतराने चौकाच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर येऊन सिंधी-मराठी वाद निर्माण झाल्याचे चित्र शहरात उभे ठाकले. मनसेने चौकाचे नाव धर्मवीर आनंद दिघे राहणार असून चौकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी होऊ लागली. चौकाचा वाद चिघळू नये, म्हणून काँग्रेस पक्षाच्या नेत्या व माजी उपमहापौर जया साधवानी यांनी वारिष्टकडे दाद मागितली. तेव्हा विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्या दालनात बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी बैठक बोलाविली.

 विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्या दालनात बोलाविलेल्या बैठकीला जया साधवानी, ओमी साई, जेसा मोटवानी, महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, नगररचनाकार अरुण गुडगुडे, सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे आदीजन उपस्थित होते. सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर अध्यक्ष नाना पाटोले यांनी चौकाच्या नामांतराचा प्रश्न सर्वपक्षीय नेत्यांनी समन्वय साधून सोडविण्याची विनंती केली. धर्मवीर आनंद दिघे व साई गुरुमुखदास दोन्ही आदर्श असून नामांतरा बाबतचा योग्य निर्णय महापालिका प्रशासन घेणार असल्याचे प्रतिक्रिया जया साधवानी यांनी दिली. नामांतराच्या वादामुळे सर्वात मोट्या चौकाचे सुशोभीकरण व नुतनीकरण लटकले. अशी टीका सर्वस्तरातून हित आहे. 

आनंद दिघे यांच्या नावावर मनसे-शिवसेना आक्रमक

 नेताजी चौकाचे नामांतर धर्मवीर आनंद दिघे असे यापूर्वी झाले असून चौकाला आनंद दिघे यांचे नाव द्यावे. यासाठी मनसे आक्रमक झाली. तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिघे यांच्या चौक नामांतरणावर आग्रही भूमिका घेऊन चौकाचे नामांतरण आनंद दिघे यांच्या नावाने होणार असल्याचे चौधरी म्हणाले.