ठाणे जिल्ह्यात मराठा संघटनांना आंदोलनाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST2021-06-24T04:27:08+5:302021-06-24T04:27:08+5:30

ठाणे: मराठा आरक्षणाबाबतची याचिका न्यायालयाने रद्द केल्याने मराठा संघटनांकडून आंदोलन होण्याची शक्यता तसेच कोरोना या संसर्गजन्य आजाराची रुग्णसंख्या लक्षात ...

Maratha organizations banned from agitation in Thane district | ठाणे जिल्ह्यात मराठा संघटनांना आंदोलनाला बंदी

ठाणे जिल्ह्यात मराठा संघटनांना आंदोलनाला बंदी

ठाणे: मराठा आरक्षणाबाबतची याचिका न्यायालयाने रद्द केल्याने मराठा संघटनांकडून आंदोलन होण्याची शक्यता तसेच कोरोना या संसर्गजन्य आजाराची रुग्णसंख्या लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात सध्या कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला तसेच चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा मनाई आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी जारी केले आहेत.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार ११ जून ते २६ जून या कालावधीत हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे, विक्री किंवा साठा करण्याला बंदी आहे. सार्वजनिक रीतीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, चिथावणीखोर भाषणे देणे तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे. अंत्ययात्रा, विवाह मिरवणूक तसेच लेखी परवानग्या घेऊन काढलेल्या मिरवणुकीस हा आदेश लागू राहणार नसल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Maratha organizations banned from agitation in Thane district