झेप प्रतिष्ठानला ‘मराठा गौरव’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST2021-02-22T04:30:21+5:302021-02-22T04:30:21+5:30
ठाणे : झेप प्रतिष्ठान या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. जवळपास ६०पेक्षा जास्त उपक्रमांच्या माध्यमातून झेप प्रतिष्ठान परिवार ...

झेप प्रतिष्ठानला ‘मराठा गौरव’ पुरस्कार
ठाणे : झेप प्रतिष्ठान या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. जवळपास ६०पेक्षा जास्त उपक्रमांच्या माध्यमातून झेप प्रतिष्ठान परिवार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. शिक्षणातून समृद्धी या ब्रीद वाक्यानुसार शैक्षणिक क्षेत्रातून समाजाची प्रगती साधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्या अंतर्गत जव्हारच्या आदिवासी पाड्यातील जवळपास १,००० शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, कॉम्प्युटर प्रयोगशाळा, तसेच या पाड्यातील लोकांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन करत असते.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये जवळपास ८०० लोकांना झेप प्रतिष्ठानने अन्न-धान्य पुरवले, तसेच कोल्हापूर सांगली पुरादरम्यानही लोकांना जीवनावश्यक साहित्य पुरवले होते. अशा अनेक उपक्रमांची दखल मराठी क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज ठाणे, तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव ठाणेतर्फे झेप प्रतिष्ठानच्या सामाजिक योगदानाबद्दल शुक्रवारी शिवजयंती दिनानिमित्त ‘मराठा गौरव पुरस्कार २०२१’ ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार झेप प्रतिष्ठानच्या सर्व मित्र परिवार आणि प्रत्येक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळे मिळाला आहे, असे झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी सांगितले.
--------------
फोटो मेलवर