आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:26+5:302021-05-25T04:45:26+5:30
ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करून सोमवारी ठाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात ...

आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन
ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करून सोमवारी ठाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकारविरोधात यावेळी पिंडदान करत असतानाच पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी राज्यभर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. ठाण्यातही मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात पिंडदान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तो हाणून पाडला. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत, आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे, आरक्षण मिळाले, तर यापुढे उग्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिला.