मढवी शाळा परिसरात अनेक समस्या

By Admin | Updated: September 23, 2015 03:57 IST2015-09-23T03:57:46+5:302015-09-23T03:57:46+5:30

केडीएमसीत मैदानांची वानवा असतांना महापालिकेच्या ९२ क्रमांकाच्या मढवी शाळा या परिसरातील वॉर्डमध्ये ३ ठिकाणी मैदानांचे आरक्षण आहे

Many problems in the Madhvi school premises | मढवी शाळा परिसरात अनेक समस्या

मढवी शाळा परिसरात अनेक समस्या

अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसीत मैदानांची वानवा असतांना महापालिकेच्या ९२ क्रमांकाच्या मढवी शाळा या परिसरातील वॉर्डमध्ये ३ ठिकाणी मैदानांचे आरक्षण आहे. सुदैवाने ते सुस्थितीत आहे. मात्र, त्यातील नानासाहेब धर्माधिकारी उद्यान वजा मैदानाची पावसाने त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र पाणी साचलेले असून झोपाळे, खेळायची अन्य साधने यांच्यापर्यंत चिमुरडे जाऊही शकत नाहीत. याच भुखंडाशेजारील जागेतही ज्ञानेश्वर माऊलींच्या नावे अन्य एक भूखंड आहे. परंतु, त्याची योग्य निगा न राखल्याने तेथे हिरवळ, झाडी झुडपे उगवलेली आहेत. याखेरीज वॉर्डात कचराकुं डी नसली तरीही स्वच्छता नसल्याने नागरिक हैराण आहेत. भटक्या कुत्र्यांचीही समस्या गंभीर असून त्यामुळेही रहिवासी त्रस्त आहेत. गल्लीबोळांचे रस्ते असून त्यात पेव्हर ब्लॉक असले तरीही पक्के रस्ते हवेत, अशी अपेक्षा आहे. काही धोकादायक इमारती आहेत त्यामध्ये राहणाऱ्या भाडेकरु-मालक यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याने गुंता सुटता सुटत नाही. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जैसे थे असून नगरसेविका ते थांबवू शकलेल्या नाहीत. त्यामुळेही वॉर्डाचा विस्तार कसाही झाला आहे. आपत्कालीन स्थितीत वॉर्डात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. काही ठिकाणी गटारे उघड्या असल्यानेही नागरिकांना त्रास होतो. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रेलचेल असली तरीही विशेष नियोजन नसते. नागरिक आपापल्या परिने धार्मिक सलोखा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतात. एका ठिकाणी झोपडपटट्टी परिसर असून तेथे सुमारे १०० घरे आहेत. त्या ठिकाणच्ता शौचालयाला डागडुजीचीची तर परिसराला स्वच्छतेची आणि पायवाटा चांगल्या असण्याची अपेक्षा आहे. केडीएमटीची बससेवा वॉर्डात येत नाही,अंतर्गत रस्त्यांना फारशा प्रमाणात रिक्षाही जात नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. कोपरसह डोंबिवली रेल्वे स्थानक नागरिकांना सोयीस्कर असले तरीही कोपरला जातांना नाकीनऊ येत असल्याने बहुतांशी नागरिक डोंबिवलीतूनच प्रवास करतात. सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने तसेच त्यासाठी कोणीही जागा देत नसल्यानेही ती सुविधा येथे नाही.

Web Title: Many problems in the Madhvi school premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.