शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren Murder Case:मोटार चोरी, स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा परस्पर संबंधाचा एटीएस करणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 22:12 IST

मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ मोटारीची चोरी, मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मोटारीमध्ये मिळालेली स्फोटके आणि मनसुख यांची हत्या या तिन्ही गुन्हयांचा नेमकी परस्पर संबंध काय? याचा सखोल तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) करावयाचा आहे.

ठळक मुद्देतब्बल १७ दिवसांनी केली दोघांना अटक एटीएस शोधणार हिरेन यांच्या हत्येचे कारण?

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ मोटारीची चोरी, मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मोटारीमध्ये मिळालेली स्फोटके आणि मनसुख यांची हत्या या तिन्ही गुन्हयांचा नेमकी परस्पर संबंध काय? याचा सखोल तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) करावयाचा आहे. त्यासंबंधीचे पुरावेही गोळा करायचे असल्यामुळे आरोपी नरेश गोर (३१) आणि विनायक शिंदे (५१) या दोघांनाही कोठडी देण्याची मागणी एटीएसनेठाणे न्यायालयात रविवारी केली.मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे आल्यानंतर तब्बल १७ दिवसांनी यातील दोन आरोपींना अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने नरेश आणि विनायक या दोघांना अटक केली. हा गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे अटक आणि यातील पाहिजे आरोपी सचिन वाझे यांनी केलेल्या गुन्हयातील तांत्रिक आणि भौतिक पुरावे नष्ट करण्यासाठी नेमके काय केले? याचा आरोपींकडे सखोल तपास करावयाचा असल्याचे एटीएसने रविवारी ठाणे न्यायालयात सांगितले. वाझे तसेच अटकेतील दोघा आरोपींनी गुन्हयात वापरलेली वाहने याचा शोध घेऊन ती जप्त करावयाची आहेत. तसेच गुन्हयात वापरलेल्या मोबाईलचाही शोध बाकी आहे.* खून नेमकी कसा केला?अटकेतील आरोपी यांनी खूनासाठी वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे. तसेच मनसुख यांच्या अंगावरील सोनसाखळी, पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी, मनगटी घडयाळ, मोबाईल फोन, पाकिट आणि पाकिटातील डेबीट कार्ड, क्रेडीट कार्डची विल्हेवाट कशी लावली? त्याचा शोध घेऊन ते जप्त करणे बाकी असल्याचेही एटीएसने सांगितले.आरोपींनी मनसुख यांचा खून नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कुठे केला. खूनाचा कट कुठे रचला? या कटात आणखी कोण कोण सामील होते का ? या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींची कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे मोटार चोरी, स्फोटके आणि खूनाचा गुन्हा यांचा परस्पर संबंध काय? याचाही आरोपींकडे सखोल चौकशी करायची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व बाजू ऐकल्यानंतर ठाणे न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist Squadएटीएस