शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

'ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 13:31 IST

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले

ठळक मुद्देमुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १७ ) ठाकरे सरकारच्या ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ठाकरे सरकारवर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप केला. यावेळी बोलतांना सोमय्या म्हणाले कि आपण कालच हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटी दरम्यान हिरेन परिवार प्रचंड तणावात असल्याचे मला आढळले असून ठाकरे सरकारच्या वाझे गँग कडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत असल्याने हिरेन परिवाराला सुरक्षा पुरविण्यात यावी अशी विनंती व मागणी लेखी पत्राद्वारे आपण एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. 

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. तर या हिरेन प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप व ट्विट काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला असून याबत सोमय्या यांना विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसचे सचिन सावंत हे हिरेन प्रकरण भरकटविण्याचा प्रयत्न करत असून सरकार तुमचा , पोलीस तुमचे वाझेही तुमचाच मग हिरेन प्रकरणात पंधरा दिवस सरकार व पोलीस झोपा काढत होते काय ? की हे सर्व जण ५० कोटींच्या वासुलीत व्यस्त होते असा प्रती सवाल व आरोप देखील सोमय्या यांनी केला असून सचिन वाझेचा बोलविता धनी देखील तुरुंगात जाणार असल्याचा विश्वास सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याsachin Vazeसचिन वाझेChief Ministerमुख्यमंत्री