शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत अखेर मनोज शिंदे गटाची हार तर पूर्णेकर गटाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 5:40 PM

अपेक्षेप्रमाणे युवक कॉंग्रेसची निवडणुक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत शहर अध्यक्ष मनोज शिंदे गटाची हार झाली आहे. तर जवळ जवळ सर्वच जागांवर स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर गटाने बाजी मारली आहे. युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मो. झीया शेख यांनी बाजी मारली.

ठळक मुद्देशिंदे गटाला केवळ कोपरी पाचपाखाडीवर समाधानमो. झिया शेख यांना १६६० मते

ठाणे - अखिल भारतीय युवक काँग्रेसच्याठाणे जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर शहर अध्यक्ष मनोज शिंदे गटाची हार झाली आहे. स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर गटाने या निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यानुसार युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी झिया शेख यांनी बाजी मारली आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले मनोज शिंदे समर्थक सबप्रीत बिंद्रा यांचा पराभव झाला आहे.

                  युवक कॉंग्रेसची संघटनात्मक निवडणूक संपूर्ण राज्यात घेण्यात आली होती. ठाण्यातही या निवडणूका मागील आठवड्यात पार पडल्या. या निवडणूकीत ठाण्यातील पाच विधानसभा क्षेत्र मिळून एक जिल्हाध्यक्ष व पाच विधानसभा अध्यक्ष तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारीऱ्यांसह प्रदेशअध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस यांच्याकरीता मतदानाची प्रकिया पार पडली. ठाण्याची ही निवडणुक प्रथमच प्रतिष्ठेची मानली गेली होती. त्याचे कारणही तसेच होते, या निवडणुकीत मनोज शिंदे गट आणि स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर यांना मानणाऱ्या गटाचे प्रतिनिधी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याची चर्चा शहरभर रंगली होती. अखेर मनोज शिंदे गटाचा यात पराभव झाला आहे.या निवडणूकीचा निकाल शुक्रवारी नागपूर येथून जाहीर करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मो.झिया शेख यांनी बाजी मारली असून त्यांनी १६६० मते घेऊन विजय मिळवला. तर सबरप्रीत बिंद्रा यांना ११८४ मते पडली. ठाणे शहर विधानसभा अध्यक्षपदी स्वप्नील भोईर, ओवळा-माजीवडा विधानसभा अध्यक्षपदी महेश म्हात्रे, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्षपदी दिपक पाठक (मनोज शिंदे समर्थक) तर कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी वसीम हजरत व मीरा-भाईंदर मतदार संघात रियाज सय्यद यांनी या निवडणूकीत विजय मिळवला तर जिल्हा उपाध्यक्षपदी महिला आरक्षण मध्ये सोनलक्ष्मी घाग व एसी आरक्षण मध्ये किशोर कांबळे निवडून आले. जिल्हा सरचिटणीपदी खुल्या गटातून रोशन पाटील, मयांक गुप्ता, जयेश पाटील, सचिन जैन व मेहेर चौपाणे तर एस.सी.आरक्षणात विशाल वाघ व ओबीसी आरक्षणात तेजस घोलप यांनी बाजी मारली.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकcongressकाँग्रेस