मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

By Admin | Updated: March 31, 2017 04:08 IST2017-03-31T04:08:11+5:302017-03-31T04:08:11+5:30

भिवंडी पालिकेचे काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

Manoj Mhatre murder case: Another man arrested | मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

ठाणे : भिवंडी पालिकेचे काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सुजित ऊर्फ बंड्या बळीराम म्हात्रे (३३) असे आरोपीचे नाव असून त्याचा मनोज म्हात्रे यांच्यावर जुना भांडणाचा राग होता.
मंगळवारी या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रशांत म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाली. त्यानंतर, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने भिवंडीतून सुजितला अटक केली. ठाणे पोलिसांनी २० जणांवर मोक्कांतर्गत केलेल्या कारवाईत सुजितचा समावेश आहे. हत्येनंतर सुजित याने प्रशांतला दमण व इतर ठिकाणी लपवून ठेवल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याच्या अटकेने आरोपींची संख्या आता १४ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मनोज म्हात्रे हत्येमध्ये सुजितचा महत्त्वाचा सहभाग असून त्याला मोक्का न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Manoj Mhatre murder case: Another man arrested