मनोहर डुंबरे आता भाजपात

By Admin | Updated: October 7, 2016 05:21 IST2016-10-07T05:21:00+5:302016-10-07T05:21:00+5:30

कोपरीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र असतांनाच आता घोडबंदर भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे

Manohar Dumbre is now in the BJP | मनोहर डुंबरे आता भाजपात

मनोहर डुंबरे आता भाजपात

ठाणे : कोपरीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र असतांनाच आता घोडबंदर भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासह येथील पक्षाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीची स्थिती ही आता कल्याण डोंबिवलीमधील राष्ट्रवादी प्रमाणेच झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा डावखरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या लच्छु टिकमाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर बुधवारी भरत चव्हाण यांनीदेखील भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा घोडबंदर भागातही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. येथील पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी गुरुवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या समवेत वॉर्ड अध्यक्ष चंद्रकात देसले, डी.सी. पाटील, वामन काळे, संजय पाल, रणजित यादव, राम भोईर यांच्यासह सुमारे २५ पदाधिकाऱ्यांनीही देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे आणखी दोन नगरसेवकदेखील शिवसेना आणि भाजपाच्या संपर्कात असून ते आरक्षण सोडतीनंतर पक्ष सोडणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Manohar Dumbre is now in the BJP