शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

बॅरेज धरणात मानखुर्दच्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 05:56 IST

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पहाटेपासून पाऊस सुरू असून, बदलापूर येथील बॅरेज धरणात

ठाणे/बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पहाटेपासून पाऊस सुरू असून, बदलापूर येथील बॅरेज धरणात धबधब्यांवरील पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली होती. या पर्यटकांपैकी मानखुर्द येथील गोपाळ दास (२०) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी हा प्रकार घडला असून, त्याचा मृतदेह अग्निशमन विभागाने बाहेर काढला.शुक्र वारी बॅरेज धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेले बदलापूर येथील चार तरुण बॅरेज धरणातील पाण्याच्या मधोमध चौथऱ्यावर अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका केल्यावर रविवारीही असाच एक प्रकार घडला.बॅरेज धरणाच्या खालच्या ओढ्यावर पोहण्यासाठी उतरलेला गोपाळ या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. हा तरुण मानखुर्द येथील रहिवासी असून, तो आपल्या मित्रांसोबत येथे पिकनिकसाठी आला होता. पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख आर. बी. पाटील यांनी केले आहे.दरम्यान, ठाणे जिल्ह्यात बहुतांश भागात झालेल्या पावसाने झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावे आणि नवी मुंबईतील १४ गावे यांच्या वेशीवर असलेल्या घेसर मधील रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. शनिवारपासून हा मार्ग बंद झाला असून, रविवारीदेखील हीच परिस्थिती होती.रायगडमध्ये पावसाचा जोर कायमअलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारही कायम होता. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत वाहतूक मंदावली होती. महाडजवळ सुरू असलेल्या चौपदरीकरणाचे काम पावसामुळे बंद आहे.मात्र रस्त्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे मातीचा भराव रस्त्यावर येत असल्याने दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालकांच्या सुरक्षेसाठी काही धोकादायक वळणावर बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी अपघाताची भीती चालकांकडून व्यक्त होत आहे.अलिबाग तालुक्यातील महाजने व बेलोशी गावांना जोडणाºयापुलाचा भाग रविवारी ढासळला. त्यामुळे या मार्गावरील एसटी वअन्य अवजड वाहनांची वाहतूकबंद करण्यात आली आहे. तर मुरूडमधील मणेरे गावात मुसळधार पावसामुळे वीज खांब कोसळल्याने गाव गेल्या काही दिवसांपासून अंधारात आहे.पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूचपालघर : शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यामध्ये वरुणराजाने सुरू केलेली रिपरिप रविवारीही कायम होती. कधी जोर धरणारा तर कधी उसंत घेणाºया पावसाने शेतीसाठी पूरक वातावरण तयार केल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये नांगरणीला तर काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे. वसईच्या भुईगाव डोंगरीलगतच्या आंबेडकर नगर स्थित मुख्य रस्त्यावर असलेले वडाचे झाड मध्यरात्री पडल्याने सकाळी वाहतूककोंडी झाली होती. तर विक्रमगड व वाड्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने सुट्टीचा दिवस असूनही लोकांनी बाहेर पडणे टाळले. पालघर, बोईसर, वसई, विरार व नालासोपाºयात पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले होते. शनिवारीसुद्धा हिच स्थिती होती.पावसाने कर्नाळा खिंडीत कोंडीमुंबई-गोवा महामार्गाच्या रु ंदीकरणाचे काम चालू आहे. यातच रविवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने कर्नाळा खिंडीत वाहतूककोंडी झाली होती. दोन्ही बाजूने वाहतूक धिमी झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा एक भाग म्हणून कर्नाळा अभयारण्याजवळ टप्प्याटप्प्याने दोन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी एक मार्गिकेवर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण एकाच मार्गिकेवर पडल्याने हा रस्ता काही प्रमाणात खचला आहे. यातच दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने या मार्गावर छोट्या खासगी वाहनांसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ होती. सकाळपासून कर्नाळा खिंडीत वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सकाळपासून कर्नाळा खिंडीत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. सखल भागात खडी व डांबराचा भराव टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.नवी मुंबईत ३९.६५ मि.मी. पाऊसरविवारी राज्याच्या अनेक भागांसह नवी मुंबईतही दिवसभर पावसाने हजेरी लावली. यादरम्यान संध्याकाळपर्यंत शहरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे.त्यापैकी सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस ऐरोली विभागात पडला आहे. मोरबे धरण परिसरातदेखील अद्यापपर्यंत एकूण ४५३.६० मि.मी. पाऊस कोसळल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती ७६ मीटर झाली आहे.परंतु धरण भरून वाहण्यासाठी अद्याप १२ मीटर पाण्याची आवश्यकता असल्याने पुढील महिनाभर मोरबे परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यास पुढील उन्हाळ्यापर्यंतचा नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.