हत्येच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च
By Admin | Updated: February 18, 2017 04:22 IST2017-02-18T04:22:30+5:302017-02-18T04:22:30+5:30
काँग्रेसचे नगरसेवक व सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा

हत्येच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च
भिवंडी : काँग्रेसचे नगरसेवक व सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा, या मागणीसाठी गुरुवारी रात्री ओसवालवाडी परिसरातील नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला.
अंजूरफाटा, ओसवालवाडीमागील समृद्धी अपार्टमेंट या म्हात्रे यांच्या घरापासून कॅण्डल मार्चला सुरुवात झाली. नागरिकांनी झालेल्या घटनेचा निषेध केला. कॅण्डल मार्च ठाणे रोड येथून फिरून पुन्हा त्यांच्या घराजवळ गेला.
तेथे सर्वांनी म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहिली. म्हात्रे या परिसरात राहण्यास आल्यापासून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. परंतु, ही घटना झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हत्या करणाऱ्यांना अटक करून त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)