महिलेची पर्स हिसकावणाऱ्यास पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST2021-06-18T04:27:54+5:302021-06-18T04:27:54+5:30

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानकात चालत्या मेल एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना ...

The man who snatched the woman's purse was caught by the police | महिलेची पर्स हिसकावणाऱ्यास पोलिसांनी पकडले

महिलेची पर्स हिसकावणाऱ्यास पोलिसांनी पकडले

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानकात चालत्या मेल एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना रेल्वेस्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. इमरान अली सिद्दीकी (रा. टिटवाळा) असे या चोरट्याचे नाव आहे.

जोधपूर एक्स्प्रेस ही गाडी बुधवारी (दि. १६) कल्याण स्थानकातून सुटत असताना एका चोरट्याने एका महिला प्रवाशाची पर्स हिसकावून पळ काढला. मात्र, फलाटावर गस्तीला असलेल्या पोलिसांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी तत्काळ चोरट्याच्या दिशेने धाव घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. चोरट्याने रुळांमध्ये उडी घेतली असता पोलिसांनीही उडी घेत त्याला पकडले. त्याच्याकडून महिलेची पर्स हस्तगत केली. त्याच्याकडे पाच मोबाइल आणि दागिनेही सापडले. पोलिसांनी त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले आहे.

दरम्यान, रेल्वेस्थानकात चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. स्थानकात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नसताना चोरटा स्थानकात कसा शिरला, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

------------

Web Title: The man who snatched the woman's purse was caught by the police