शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांच्या खंडणीसाठी लूम मालकाची हत्या करणाऱ्यास यूपीतून २६ वर्षांनंतर अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: April 25, 2025 21:26 IST

ठाण्याच्या मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाची कारवाई : वर्षभरापासून होती निगराणी

ठाणे : दहा लाखांच्या खंडणीसाठी जिगर मेहता (२७) या भिवंडीतील लूम मालकाची २६ वर्षांपूर्वी हत्या करणाऱ्या विनोदकुमार गुप्ता (४९) याला उत्तर प्रदेशातील परसाहेतिम गावातून नाट्यपूर्णरीत्या अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. गुप्ताने त्याच्या मूळ गावाजवळच मेडिकल शॉप थाटले होते. तब्बल एक वर्षे पोलिसांनी गुप्ता भोवती सापळा रचला होता, अशी माहिती ठाण्याच्या मध्यवर्ती शोध पथकाने दिली.भिवंडीतील चारवलीच्या शेतामध्ये जिगर यांची २९ मे १९९९ रोजी हत्या झाली हाेती. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला हाेता. यातील तीनपैकी कमलेश उपाध्याय याला यापूर्वीच अटक झाली होती. विनाेदकुमार तेव्हापासूनच पसार हाेता. त्याच्यावर मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे हवालदार दादासाहेब पाटील हे यूपीतील काही खबरे आणि विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) मदतीने गेल्या वर्षभरापासून लक्ष ठेवून हाेते. यूपीतील गुप्ताच्या मूळ गावाजवळ त्याने चंदा मेडिकल शॉप सुरू केल्याची माहिती हवालदार पाटील यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पाटील, हवालदार दादा पाटील, अंमलदार दिनकर सावंत आणि मयूर शिरसाट आदींच्या पथकाने यूपीमध्ये जाऊन गोरखपूर एसटीएफच्या मदतीने २२ एप्रिल २०२५ रोजी सिद्धार्थनगर भागातून विनाेदकुमारला अटक केली.काय घडला हाेता प्रकार-जिगरच्या पॉवरलूममध्ये राजू मेहता ऊर्फ बिशनसिंग सावत हा काम करीत हाेता. राजूने त्याचा मित्र विनोदकुमार आणि यापूर्वी अटक केलेला कमलेश उपाध्याय यांनी कट रचून २८ मे १९९९ राेजी रात्री कारखान्यातील वीजपुरवठा खंडित केला. ताे सुरू करण्यासाठी जिगरला बाेलवून या त्रिकुटाने मारहाण केली. विनोदकुमारने इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून जिगरच्या अंगावरील दागिने आणि खिशातील राेकड काढून घेतली. त्यानंतर राजूने सुरीने गळा कापून त्याची हत्या केली. त्याच्याच स्कूटरने मृतदेह ठाकुरपाडा-सरवली शिवारातील एका शेतात टाकला. हत्येनंतर आराेपींनी जिगरच्या घरी एसटीडी बुथवरून २९ मे राेजी सकाळी ६:१५ च्या सुमारास फोन करून त्याच्या अपहरणाची माहिती दिली. त्याच्या सुटकेसाठी दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकीही दिली. विनोदकुमारने बीईएमएस (बॅचलर ऑफ इलेक्ट्राे- हाेमिओपॅथी मेडिसिन ॲन्ड सर्जरी) चे मुंबईतील काॅलेजमधून शिक्षण घेतले हाेते. खुनानंतर तो मुंबईतून रेल्वेने पळून कधी मूळ गावी, तर कधी दिल्लीमध्ये मोबाइल जवळ न बाळगता राहत होता.अशी झाली अटक-पाेलिस मागावर नसल्याची खात्री झाल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्याने मूळ गावालगत हिसामुद्दीनपूर येथे मेडिकल स्टोअर्स सुरू केले. दाेन दिवसांच्या टेहळणीनंतर २२ एप्रिल राेजी ठाणे पाेलिसांनी विनाेदकुमारला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश