इंग्लिश खाडी पार करून ठाण्याच्या मानव मोरेने रचला इतिहास, १३ तास ३७ मिनिटं अखंड पोहत केली विक्रमी कामगिरी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 18, 2025 12:29 IST2025-06-18T12:29:31+5:302025-06-18T12:29:49+5:30

Thane: पाचपाखाडी परिसरात राहणारा मानव मोरे या तरुण जलतरणपटूने आपल्या अपार मेहनतीने, अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश खाडी पार करून भारताच्या क्रीडाक्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे.

Man swims non-stop for 13 hours and 37 minutes | इंग्लिश खाडी पार करून ठाण्याच्या मानव मोरेने रचला इतिहास, १३ तास ३७ मिनिटं अखंड पोहत केली विक्रमी कामगिरी

इंग्लिश खाडी पार करून ठाण्याच्या मानव मोरेने रचला इतिहास, १३ तास ३७ मिनिटं अखंड पोहत केली विक्रमी कामगिरी

ठाणे -  पाचपाखाडी परिसरात राहणारा मानव मोरे या तरुण जलतरणपटूने आपल्या अपार मेहनतीने, अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश खाडी (English Channel) पार करून भारताच्या क्रीडाक्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे. समुद्राचं तापमान थंड, लाटा अनियमित आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करत करत मानवने १३ तास ३७ मिनिटं अखंड पोहत ही खाडी पार केली.

मानवने त्याचे जलतरणाचे प्रशिक्षण ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे घेतले आहे. अगदी लहानपणापासून पाण्याशी असलेली जवळीक आणि त्याच्यातली प्रचंड मेहनतीची तयारी त्याला या स्तरावर घेऊन गेली आहे. पण हे यश फक्त माझेच नाही तर त्याच्यासाठी परिश्रम घेणारे त्याचे मार्गदर्शक, प्रशिक्षक कैलास आखाडे सर आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे त्याचे पालकांचा यांचा तितकाच मोलाचा वाटा असे त्याने सांगितले त्याचं हे यश अनेक नवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारं आहे. असे त्याचे प्रशिक्षक म्हणाले. चिकाटी, जिद्द आणि कठोर मेहनत असल्यास कोणतीही खाडी पार करणं अशक्य नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Man swims non-stop for 13 hours and 37 minutes

टॅग्स :thaneठाणे