अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:06 AM2021-01-12T00:06:34+5:302021-01-12T00:07:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अवघ्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग करणाºया ओमप्रकाश गिरी (५०, रा. ...

Man arrested for molesting minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अवघ्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग करणाºया ओमप्रकाश गिरी (५०, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट, अंबिकानगर येथे राहणाºया एका २८ वर्षीय महिलेने तिच्या या पिडित मुलीला दही आणण्यासाठी ९ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास जवळच्याच दुकानावर पाठविले होते. त्यावेळी ओमप्रकाश याने या मुलीशी अश्लील चाळे केले. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारासही घराजवळ ही मुलगी खेळत असतांना त्याने तिला जवळ घेत ‘तसाच’ प्रकार केला. याची माहिती मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ओमप्रकाश याच्याविरुद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनयमाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक वैशाली रासकर आणि उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ यांनी आरोपी ओमप्रकाश याला अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Man arrested for molesting minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.