शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी पाट्या करा, अन्यथा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा, मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 13:08 IST

न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानदारांनवर कारवाई नाहीच

ठाणे - शहरातील सर्व दुकानांवरील पाट्या ह्या २५ नोव्हेंबर अखेर मराठीत कराव्यात असा निर्णय न्यायालने दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यामुळे आणि याबाबत ठाण्यातील बाजारपेठांमध्ये कोणतीच कारवाई न झाल्याने मराठीत पाट्या करा, नाहीतर मनसेचा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा असा इशारा देत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्या वतीने रविवारी ठाण्यात तीव्र आंदोलन करत निषेध केला.

मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून अनेक ठिकाणी पाट्या मराठी भाषेत केल्या गेल्या नाही. गेल्या १४ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावरून लढत आहे. मनसेच्या वतीने मराठी पाट्यांसाठी विविध आंदोलन देखील करण्यात आली यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र अद्यापही राज्यात मराठी पाट्यांचे फलक फारसे झळकताना दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व दुकानांना तसेच व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनांवरील पाटी मराठी असावी, यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. या आदेशाचे पालन करून घेणे हे स्थानिक महानगरपालिका प्रशासन व कामगार आयुक्त यांचे काम आहे. पण असे असून देखील महानगरपालिका व कामगार प्रशासनाच्या वतीने अद्यापही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दुकानांना मराठी पाट्या करण्यासंदर्भात साधी नोटीस देखील बजावण्यात आलेली नाही.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी अस्मिता तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांच्या अपमान करणाऱ्या  ठाण्यातील एम जी या चायनीज ऑटोमोबाईल कंपनीच्या शोरूम ला काळे फासून आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. तसेच ठाण्यातील सर्व व्यावसायिक धारकांनी त्यांच्या दुकानावरील पाटी मराठीत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी दिला.आंदोलनात मनसेचे दिनकर फुल्सुंदर,मनीष सावंत,हिरा पासी ,कृष्णा देवकोटा व आधी मनसैनिक उपस्थित होते.

मराठी पाट्या करण्यासंदर्भात प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही तर मनसेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येईल व त्याची सर्वस्व जवाबदारी ही प्रशासनाची असेल स्वप्नील महिंद्रकरठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे 

टॅग्स :thaneठाणेmarathiमराठीMNSमनसे