नव्या सुविधेचे सोने करा : रवी ठक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:14+5:302021-03-22T04:36:14+5:30
ठाणे : स्पोर्टिंग क्लब्स कमिटीने ठाण्याच्या ऐतिहासिक सेंट्रल मैदानावर ठाणेकरांसाठी खास फ्लड लाइट सराव शिबिराची सोय उपलब्ध करून दिली ...

नव्या सुविधेचे सोने करा : रवी ठक्कर
ठाणे : स्पोर्टिंग क्लब्स कमिटीने ठाण्याच्या ऐतिहासिक सेंट्रल मैदानावर ठाणेकरांसाठी खास फ्लड लाइट सराव शिबिराची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच मैदानावर माझी मुंबईच्या युवा संघात जाधव सरांनी निवड केली. पुढे माझी मुंबईच्या रणजी संघातही निवड झाली. ठाणेकरांनी या मैदानावर सराव करून रणजी ट्रॉफीपर्यंत मजल मारावी. मी मार्गदर्शन करण्यास तयार आहे, असे आश्वासन मुंबईसह आसाम संघाकडून रणजी ट्रॉफी खेळलेले रवी (रवींद्र ) चंपकलाल ठक्कर यांनी दिले.
स्पोर्टिंग क्लब्स कमिटी ठाणे यांच्या विद्यमाने सेंट्रल मैदानावर सुरू झालेल्या फ्लड लाइट क्रिकेट शिबिराचे उद्घाटन रणजीपटू रवी ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठक्कर बोलत होते. स्वागतपर भाषणात स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मढवी म्हणाले की, आपल्या क्लबच्या ९७ वर्षांच्या इतिहासात सनलाइट नव्हे तर मुनलाइट क्रिकेट प्रथमच सुरू होत आहॆ. याप्रसंगी रणजीपटू संदीप दहाड, क्रिकेट प्रशिक्षक हेमंत तावडे, अतुल फणसे, श्रावण तावडे, सुनील आशीनकर, मुकुंद सातघरे, प्रल्हाद नाखवा, सुशील म्हापुस्कर, दिलीप धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सत्यम विश्वकर्मा यांनी टाकलेला पहिला चेंडू सुजीत कांबळे यांनी टाळ्यांच्या गजरात खेळला.
--------------------------------
कॅप्शन : रवी ठक्कर यांचे स्वागत करताना अध्यक्ष डॉक्टर राजेश मढवी व इतर मान्यवर