शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मेजर कौस्तुभ राणेंच्या हौतात्म्यानं मीरारोडवर शोककळा; भाजपा नेते मात्र वाढदिवसाच्या पार्टीत दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 11:25 IST

भाजपा नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

मीरारोड - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकसागरात बुडालं असताना भाजपाकडून मात्र नगरसेवकाचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भाजपा नगरसेवकाचा वाढदिवस डिजेच्या दणदणाटात साजरा झाला, तिथपासून शहीद राणे यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे. भाजपाचे नगरसेवक आणि प्रभाग समितीचे माजी सभापती आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस साजरा झाला. या समारंभात महापौर डिंपल मेहता, स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपाच्या नेत्यांनी भाषणंदेखील ठोकली. विशेष म्हणजे या सर्वांनी सोशल मीडियावर शहीद राणे यांना आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. मात्र त्याच संध्याकाळी भाजपाच्या सर्व नेत्यांनी वाढदिवसाची पार्टी झोडली.सोमवारी रात्री काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना चार जवानांना वीरमरण आलं. यात मीरारोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच परिसरावर शोककळा पसरली. यानंतर राणे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. महत्वाचे म्हणजे स्वत: आमदार नरेंद्र मेहता व परिसरातील नगरसेवकांनीदेखील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. मात्र त्यानंतर या मंडळींनी शीतल नगरच्या बाजूच्याच भागात भाजपा नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. शहीद राणे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांगिड इस्टेटजवळील सेंट पॉल शाळेसमोर आलिशान मंडप टाकून भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डीजेच्या तालावर जल्लोष केला. यावेळी विविध थंडपेयांसह खाद्यपदार्थाची मोठी मेजवानी ठेवण्यात आली होती. महापौर डिंपल मेहता यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच भाजपाचे प्रशांत दळवी, दिपीका अरोरा, हेमा बेलानी, दौलत गजरे, हेतल परमार, अनिता मुखर्जी, विविता नाईक, वंदना भावसार या नगरसेवकांसह निलेश सोनी, काजल सक्सेना, सोनिया नायक, किरण चेऊलकर, सुरेश दुबे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मांजरेकर यांनी केक कापले. आमदार नरेंद्र मेहता यांचं आगमन होताच शहेंशाह हे गाणं डिजेवर वाजवण्यात आलं. महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना केक भरवून वाढदिवसाचा आनंद लुटला. यावेळी महापौर डिंपल व आमदार मेहता यांनी भाषण करत मांजरेकर यांना शुभेच्छा दिल्या. याविषयी मांजरेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

टॅग्स :Kaustubh Raneकौस्तुभ राणेंMLAआमदारmira roadमीरा रोडMartyrशहीदBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान