मुंब्र्यात मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST2021-07-23T04:24:45+5:302021-07-23T04:24:45+5:30

मुंब्रा : मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दत्तवाडी परिसरातील चार झाडे पाटील चाळीतील घरांवर ...

A major accident was averted in Mumbra | मुंब्र्यात मोठी दुर्घटना टळली

मुंब्र्यात मोठी दुर्घटना टळली

मुंब्रा : मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दत्तवाडी परिसरातील चार झाडे पाटील चाळीतील घरांवर टेकल्याचे बुधवारी रात्री निदर्शनास आले. खबरदारीची उपाययोजना म्हणून चाळीतील शमशुद्दिन शेख, मोहम्मद शेख, इस्माईल शेख, कमलेश प्रजापती, हानिफ खान आणि प्रतीक कुरेशी यांच्या कुटुंबांतील सदस्यांना घरे रिक्त करून इतरत्र राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती ठामपाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली. दरम्यान, घरांवर टेकलेली झाडे जर घरांवर कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे साहाय्यक अधिकारी हेमंत दिवटे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: A major accident was averted in Mumbra