शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा, आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सोहळ्यात महापौरांचं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:28 IST

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक महापौर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त ज्ञानरचनावाद या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देठाणे महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.साताऱ्याच्या विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी मुलांना कशाप्रकारे शिकवावे, या संबंधी मार्गदर्शन केले.या सोहळ्यात एकूण 14 शिक्षकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

ठाणे : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाचा सर्वात मोठा वाटा असून जीवनात येणारे सर्वच  शिक्षक हे आदर्श शिक्षक असून ते सर्वच शिक्षक हे  पुरस्कारासाठी पात्र आहे असे मत महापौर मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने 'आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार' सोहळा संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापालिका शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात असून सद्यस्थितीत राजकारणामध्ये  उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती या ठामपा शाळेत शिकलेल्या असून त्याचा आम्हाला अभिमान वाटतो . तसेच  ठामपाच्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांचे बरेच प्रश्न मार्गी लावले असून येणाऱ्या काळात शिक्षकांच्या विविध  प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ठामपा शाळेतील शिक्षकांनी आपली शाळा, शाळेभोवतालचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना एक दिवस सुट्टी देऊन आपण स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन फक्त दिखाव्यातून स्वच्छता न दाखवता प्रत्यक्ष कार्यातून स्वच्छता दाखवावी, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.           यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन करताना पालिका क्षेत्रातील गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी आपली असून समाज घडवण्याचे काम या निमित्ताने होत असते असे सांगितले. यापुढेही महापालिकेच्या वतीने चांगले शिक्षण देण्याचे काम सुरु राहील असे त्यांनी सांगतानाच शिक्षकांनी ती आपली जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.         शिक्षक गौरव दिन सोहळ्यानिमित्त  प्रतिभा भराडे विस्तार अधिकारी कुमठे बीट सातारा यांनी 'ज्ञानरचनावाद ' या विषयावर उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले . प्रत्येक मुलं हे युनिक असून त्यांना त्यांच्या कलेने शिकू द्यावे. मुलांना कशा पद्धतीने शिकवले पाहिजे, त्यांच्याशी कसा संवाद साधावा, सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा मुलाच्या जडण घडणावर कसा परिणाम होतो. आदी विषयावर श्रीमती भराडे यांनी  मार्गदर्शन केले.

शिक्षक गौरव दिन सोहळ्यानिमित्त एकूण १४ शिक्षकांना 'आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार' देण्यात आले आहे .यामध्ये आशालता  घाटगे (शाळा क्र ४४), मनीषा लोहोकरे(ठामपा माध्यमिक शाळा क्र १ ) ,निर्मला राजेश शेंडे ( शाळा क्र १०२ किसननगर ), प्राची संजय तळगावकर (शाळा क्र.१० मानपाडा), अरुंधती किशोर डोमाळे (शाळा क्र. १८ ज्ञानसाधना ), विद्या रामदास फुलसुंदर ((शाळा क्र.२३किसननगर ), दिलशाद अकबर शेख (शाळा क्र.२२ सावरकरनगर), निशा श्याम संखे (शाळा क्र.५८ भाईंदरपाडा), हर्षदा हेमंत वर्तक (शाळा क्र.९७ गायमुख ), लुबना तकी शेख (शाळा क्र.११३ मुंब्रा), मनीषा भाऊसाहेब डुकरे (ज्ञानदीप विद्यालय ,मुंब्रा ), मंजितकौर देवेन्द्र अस्थाना (एसईएस  हायस्कूल पाचपाखाडी ), प्रतिभा सूर्यकांत महाडिक (शाळा क्र.८० साबे ), अस्मिता अनिल पाठक( शाळा क्र.१०२ ), आदी शिक्षकांना महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते 'आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले.

 'आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार' या सोहळ्याला नगरसेविका संध्याताई मोरे, नगरसेविका श्रीमती.जोशी, उप आयुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, लेखाधिकारी भरत राणे, यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका